सहकारातील अनेक कारखाने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सहकारी कारखाने हे बंद पडले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांनी हे कमी पैशात विकत घेतले आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे देखील सांगितले गेले. आता राज्यातील तोट्यात जाणारे सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या राज्य सरकार खरेदी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या तोट्यातील कारखान्यांची विक्री होत असल्याने राज्य सरकारचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले.
यामुळे सहकारातील बंद पडणारे कारखाने पुन्हा सुरू होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साखर कारखाने, सूत गिरणी, सहकारी संस्था यांनी राज्य सरकारकडून निधी दिला जातो. सरकारने काही कारखान्यांना 70 ते 90 टक्क्यांपर्यंत निधी दिला आहे.
जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर मंगेश चव्हाणांनी केलं 'हे' काम, एकनाथ खडसे याचा फोटो..
सरकारची हमी असलेले सूत गिरणी, साखर कारखाने, सहकारी संस्था तोट्यात जातात. त्यानंतर बँका थकबाकी, कर्ज वसुलीसाठी त्यांची कवडीमोल दराने विक्री करतात. यामुळे सरकारचे मोठे नुकसान होते. दुसरीकडे खासगी संस्था, व्यक्ती या व्यवहारानंतर जमिनीच्या आधारे पुन्हा कर्ज घेतात. या सगळ्या व्यवहारात राज्य सरकारची मोठी फसवणूक होते.
विहिरीसाठी 4 लाख फिक्स! मान्यतेसाठी 'बीडीओ' ना अधिकार, ग्रामसभेत मंजुरी देणे बंधनकारक
हा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशांवर खासगी लोकांनी केलेली लूट असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. यामुळे आता तरी यावर आळा बसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे आता बंद पडलेले कारखाने सुरू होणार का हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या;
वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी केला जुगाड! शेतकरी ठरले शास्त्रज्ञांवर भारी
'शेतकरी कर्जाच्या ओझ्याने कोलमडला आहे, दररोज तीन आत्महत्या होत आहेत, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा'
ड्रोन विकत घेण्यासाठी सरकार 4 लाख रुपये देणार, शेती करणे होणार सोपे
Share your comments