प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ

Monday, 25 February 2019 08:10 AM


मुंबई:
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गोरखपूर, उत्तर प्रदेश येथून करण्यात आला. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी 2 हजार 21 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहे.

या योजनेच्या शुभारंभप्रसंगी वर्षा निवासस्थान येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव डी. के. जैन, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभाग घेतला. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 14 लाख 26 हजार 927 शेतकऱ्यांना 2 हजाराचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आला आहे. बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ काही आठवड्यात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा या योजनेमध्ये समावेश आहे.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्राच्या वतीने मुरबाडचे गौतम चिंतामन पवार यांनी प्रतिनिधीत्व केले असून त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले. हा क्षण महाराष्ट्रातील ‘अन्नदाता’ शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक असल्याने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 हप्त्यात 6 हजार रूपये मिळणार आहेत. या पैशातून बि-बियाणे, खते, कृषी अवजारे इत्यादी शेतीशी निगडीत बाबींचा प्रश्न सुटू शकणार आहे. यामुळे देशातील जवळपास 12 कोटी  छोट्या शेतकऱ्यांना  थेट लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर 75 हजार कोटी थेट जमा होणार आहेत.

Prime Minister Kisan SAmman Nidhi narendra modi प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नरेंद्र मोदी

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.