पीएम किसान पोर्टलचा शुभारंभ

Friday, 08 February 2019 08:40 AM


नवी दिल्ली:
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणीसाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे जेणेकरुन शेतकऱ्यांना जलदगतीने या योजनेचे लाभ मिळतील.

केंद्रीय कृषीमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या योजनेअंतर्गत पात्र छोट्या शेतकरी कुटुंबांची निवड राज्य सरकारांनी करायची आहे आणि बँक खातीसारखे आवश्यक तपशील ऑनलाईन पोर्टलवर द्यायचे आहेत जेणेकरुन पात्र कुटुंबांना लाभाचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी गावांमधील पात्र लाभार्थी जमीनधारक शेतकरी कुटुंबांची माहिती- नाव, वय, लिंग, अनुसूचित जाती-जमाती, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड वगैरे तयार करावी. पात्र कुटुंबाने या योजनेचे लाभ देताना त्यात गडबड होणार नाही याची काळजी राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी घ्यावी. लाभार्थ्याचे चुकीचे बँक तपशील असतील तर त्याने लवकरात लवकर या योजनेचे लाभ मिळतील याकडे लक्ष द्यावे.

या योजनेचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी पीएम किसान पोर्टल (http://pmkisan.nic.in) सुरु करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर ते ग्रामस्तरापर्यंत प्रशासकीय यंत्रणेचा समर्पित सहभाग आवश्यक असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Radha Mohan Singh राधा मोहन सिंह PM Kisan पीएम किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी pradhanmantri kisan samman nidhi

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.