
जगात कोरोन व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. याचा थेट परिणाम भारतातील चिकन विक्रीवर झाला आहे. यामुळे पोल्ट्री फार्मर्स आणि चिनक सेंटरच्या मालकांनी एकत्र येऊन लातुरात चिकन फिस्टव्हलचे आयोजन केले होते. या चिकन फेस्टिव्हलला दोन हजार लोकांनी हजेरी लावत चिकनचा आस्वाद घेतला. या फेस्टिव्हलमध्ये १२५ किलो तांदूळ ५०० किलो चिकन आणि २ हजार अंडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चिकन खव्वयांसाठी मेजवाणी देण्यात आली.
कोरोना व्हायरसमुळे चिकन खाऊ नये असं सांगण्यात येते परंतु लातुरात मात्र नागरिकांनी चिकन मेजवाणी वर ताव मारला. दरम्यान कोरोना व्हायरस आणि चिकनचा यात कोणताही संबंध नाही आहे. चिकन खाण्याचे फायदे नागरिकांना समजावेत याच उद्देशाने या फेस्टिव्हलचे आयोजन केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. याविषयीची माहिती जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनी दिली आहे. अवघ्या ५० रुपयात एक बिर्याणी मिळत असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.