MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

भारताची "गानकोकिळा" भारतरत्न लतादिदी पंचतत्वात विलीन! 'स्वरसम्राज्ञी'चे संगीताव्यतिरिक्त होते 'ह्या' गोष्टीवर प्रेम

भारताची स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा (Nightingale Of India), स्वरकोकीळा इत्यादी नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar) आज पंचतत्वात विलीन झाले. लता मंगेशकर यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वात नव्हे नव्हे तर जागतिक स्तरावरील संगीत-विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक अशी पोकळी जी कधीही आणि कुणाकडूनही भरून निघणार नाही.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Bharatratn Lata Mangeshkar

Bharatratn Lata Mangeshkar

भारताची स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा (Nightingale Of India), स्वरकोकीळा इत्यादी नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar) आज पंचतत्वात विलीन झाले. लता मंगेशकर यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वात नव्हे नव्हे तर जागतिक स्तरावरील संगीत-विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक अशी पोकळी जी कधीही आणि कुणाकडूनही भरून निघणार नाही.

लता दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी ब्रिटिश काळात मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर (Master Dinanath Mangeshkar) हे देखील संगीतक्षेत्रातील एक परिचित नाव आहे. त्यांच्या आईचे नाव शुद्धमती मंगेशकर असे होते. लतादीदींना हेमा म्हणून देखील त्यांच्या परिवारात पुकारले जात असे. लतादीदींनी त्यांच्या पूर्ण जीवन काळात 36 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी भारतीय तसेच काही विदेशी भाषेत देखील गाणी रेकॉर्ड केली आहेत. कन्या आपल्या संपूर्ण कार्यकाळात 50 हजार पेक्षा अधिक गाणे रेकॉर्ड केली जे की एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. संगीता व्यतिरिक्त लतादीदींना गाड्यांची आणि क्रिकेटची मोठी आवड होती. भारताची गानकोकिळा म्हणून विख्यात असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या तेराव्या वर्षी पहिल्यांदा गाणे गायले त्यांची पहिली कमाई अवघी पंचवीस रूपये होती. लतादीदींची राहणी अतिशय साधी आणि सरळ होती मात्र त्यांना गाड्यांची मोठी आवड होती. प्रसारमाध्यमांनुसार, लतादीदी यांच्याकडे गाड्यांचा मोठा संग्रह उपलब्ध होता. केवळ 25 रुपयांपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या लतादीदीकडे आता जवळपास 370 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या एवढ्या मोठ्या संपत्तीत त्यांच्या गाण्यांचा मोठा हातभार आहे. याव्यतिरिक्त लतादीदींनी अनेक ठिकाणी गुंतवणूक देखील करून ठेवली आहे. लतादीदी मुंबईमधील पेडर रोडवर प्रभू कुंज या बंगल्यात राहत होत्या.

लतादीदींनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांना गाडींचा मोठा छंद आहे. दीदींनी पहिल्यांदा शेवरलेट कार खरेदी केली होती, हे कार त्यांनी इंदोर मधून त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केली. त्यानंतर त्यांनी Buick कार खरेदी केली. त्यांना यश चोप्रा यांनी मर्सिडीज कार भेट म्हणून दिली होती. यश चोप्रा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आपली बहिण मानत असत. यश चोप्रा यांच्या बॅनर अंतर्गत बनलेला वीर झराचे संगीत रिलीज झाले तेव्हा दीदींना मर्सिडीज कार चोप्रा यांनी गिफ्ट केली होती. लतादीदी नकडे अजूनही ती कार असल्याचे सांगितले जाते. लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण भारत वर्षात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर दीदीच्या निधनाने सर्वच स्तरावरून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

लतादीदींची चाहते तसेच भारतीय राजकारणातील, समाजकारणातील, सिनेसृष्टीतील जवळपास सर्वच क्षेत्रातून लतादीदींना आठवले जात आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मुंबई मधील शिवाजी पार्कमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली, अंत्यदर्शनासाठी भारतातील सर्व क्षेत्रातील नामी-गिरामी लोकांनी मोठी गर्दी केली. लता मंगेशकर यांच्या जाण्याने भारत वर्षातील सर्व लोकांचे डोळे पाणावले आहेत. 

English Summary: lata mangeshkar passed away she had love for this thing Published on: 06 February 2022, 06:34 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters