सध्या बऱ्याच क्षेत्रांमध्ये रूढी आणि परंपरांचे जोखड अजूनही कायम आहे. काही क्षेत्रांमध्ये बऱ्याच प्रकारच्या जुन्या परंपरा मोडीत काढत नवीन पायंडा पाडला जात आहे. अशीच एक जुनी परंपरा लासलगाव बाजार समितीने मोडीत काढली व त्याचा फायदा हा संबंधित बाजार समितीला झाला.
त्याबाबतची सविस्तर माहिती अशी की, लासलगाव बाजार समिती ची स्थापना ही एक एप्रिल 1947 झालीआहे.तेव्हापासून ते आजतागायत म्हणजेच गेल्या 75 वर्षाच्या कालखंडापासून लासलगाव बाजार समितीमध्ये अमावस्याला कांदा तसेच भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव बंद असायचे.परंतु शेतकऱ्यांची कांदा विक्री ची गरज लक्षात घेऊन तसेच परिसरातील बरेच शेतकरी बांधवांची अनेक दिवसांची मागणी चा विचार करून लासलगाव बाजार समितीने ही परंपरा मोडीत काढत अमावस्या पासून प्रत्येक अमावस्येला सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव सुरु केलेले आहेत.
लासलगाव हे कांद्याच्या बाजारपेठेत आशिया खंडात प्रसिद्ध आहे. त्यातील कांद्याचे दर हे लासलगाव बाजार समिती वरून निश्चित केले जातात. या महत्त्वाच्या बाजार समितीने 10 जून 2021 पासून लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन कांदा लिलाव सुरू केले या निर्णयामुळे लासलगाव बाजार समितीत तब्बल बारा लाख क्विंटल कांद्याची आवक वाढली आहे.
आता या निर्णयामुळे बाजार समितीत शनिवार आणि अमावस्या मिळून कामकाज वाढवत 250 कोटींची उलाढाल वाढवली आहे. लासलगाव बाजार समितीने घेतलेल्या या निर्णयाचे अनुकरण राज्यातील इतर अनेक बाजार समितीने देखील करत अमावस्याच्या दिवशी बाजार समितीत लिलाव सुरू केले आहेत.
Share your comments