कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. महाराष्ट्रात कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्यातील पिकांपैकी कांदा एक प्रमुख पीक आहे. कांद्याची विक्री करण्यासठी राज्यात अनेक बाहेर समित्या आहेत. कांदा विक्रीसाठी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. सर्वात जास्त कांद्याची विक्री या बाजारपेठेत होते. पण आता मात्र लासलगाव बाजार समितीला राज्यातील एका बाजार समितीने मागे टाकले आहे.
कांद्याची विक्रमी आवक
लासलगावपाठोपाठ कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सोलापूरची ओळख आहे. पण आता मात्र, मुख्य बाजारपेठेलाच सोलापूरने मागे टाकले आहे. गेल्या महिन्यात दोन वेळा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये एकाच दिवशी 1 लाख 26 हजार क्विंटल (Onion Arrival) कांद्याची आवक झाली आहे.
यामुळे आवक वाढली
सोलापूर बाजार समितीमध्ये चांगला दर मिळत आहे. इतर बाजार समितीच्या तुलनेत अधिकचा दर आणि ज्या दिवशी कांद्याचा काटा होतो त्याच दिवशी शेतकऱ्यांना पैसेही मिळतात. त्याचबरोबर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी ही मध्यवर्ती बाजारपेठ आहे. गेल्या महिन्यातला सर्वोच्च दर 2600 तर सर्वात कमी दर हा 1350 एवढा राहिला आहे. लासलगावपेक्षाही अधिकचा कांदा यंदा सोलापूर मार्केटमध्ये यंदा दाखल झाला आहे. बाजार समितीमधील व्यवहार आणि शेतकऱ्यांची जुडलेली नाळ यामुळे आवक वाढत आहे.
सोलापूर कांदा मार्केटमध्ये नवी ओळख
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कांदा मोठ्या प्रमाणवर येत आहे. सरासरी पेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. इतर बाजार समितीच्या तुलनेत अधिकचा दर आणि ज्या दिवशी कांद्याचा काटा होतो त्याच दिवशी शेतकऱ्यांना पैसेही मिळतात. हाच उद्देश सोलापूर कृषी उत्पन्न बाजार पेठेत साध्य होत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे.
Share your comments