1. बातम्या

अमेरिकन लष्करी अळीचा मका पिकावर प्रादुर्भाव, महागडी औषधे जरी फवारली तरी सुद्धा शेतकऱ्याच्या पदरी अपयश

भारतात काही राज्यामध्ये मका या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे पूर्ण पीक ना पीक नाहीसे होत निघाले आहे. सध्या अशी भीती निर्माण झालेली आहे की ही कीड जगभर तर नाही ना पसरणार.कारण या किडीची एका वर्षात १७०० किमी पतंग आहे त्यामुळे वाऱ्यावाटे जर ही कीड पसरली तर शेतकरी वर्गाला खूप मोठे नुकसान पोहचणार आहे. या किडीचा जास्तीत जास्त प्रसार पावसाळा ऋतूमध्ये होतो.

किरण भेकणे
किरण भेकणे
infest maize crop

infest maize crop

भारतात काही राज्यामध्ये मका(maize) या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे पूर्ण पीक ना पीक नाहीसे होत निघाले आहे. सध्या अशी भीती निर्माण झालेली आहे की ही कीड जगभर तर नाही ना पसरणार.कारण या किडीची एका वर्षात १७०० किमी पतंग आहे त्यामुळे वाऱ्यावाटे जर ही कीड पसरली तर शेतकरी वर्गाला खूप मोठे नुकसान पोहचणार आहे. या किडीचा जास्तीत जास्त प्रसार पावसाळा ऋतूमध्ये होतो.

अमेरिकन लष्करी अळी या किडीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे:

अमेरिकन लष्करी अळी ही कीड प्रामुख्याने कापूस(cotton), ऊस, ज्वारी तसेच मका या पिकांवर पडते आणि हीच पिके आहेत ज्यामुळे कीड जगू शकते. ही लष्करी कीड जी आहे ती चार अवस्थामध्ये आपले जीवनमान चक्र फिरवते त्यामध्ये पहिली म्हणजे अंडी (eggs), दुसरी अळी, तिसरी कोष आणि चौथी म्हणजे पतंग.या अवस्थेत जी दुसरी अवस्था आहे जे की अळी ही पिकांसाठी खूप हनिकारक असल्याचे सांगितले आहे.नाशिक जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अमेरिकन लष्करी अळी या किडीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी वर्ग खुप संकटात अडकलेला आहे. त्या भागात प्रामुख्याने मका या पिकावर या अळीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

हेही वाचा :लाल रंगाची भेंडी ठरतेय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर,या आजारांवर सुद्धा लाभदायक

जे की ही एक अशी कीड आहे की एका रात्रीत पूर्ण क्षेत्र नासुन टाकू शकते आणि याच भीतीमुळे तेथील परिसरातील शेतकरी वर्ग मेणकुटीला आलेला आहे. नाशिक  मधील  ज्या भागातील शेतकऱ्यांचे मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव पडला आहे त्या शेतकऱ्यांनी अनेक प्रकारची महागडी औषधं आणून पिकावर फवारणी केली आहे मात्र अमेरिकन लष्करी अळी ही एक अशी कीड आहे की त्या महागड्या औषधाने सुद्धा मरलेली नाही त्यामुळे शेतकरी राजा पूर्णपणे संकटात अडकलेला असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे.

आधीच अनेक नैसर्गिक आपत्ती तसेच बाजारात भाजीपाल्याचे भाव कोसळले असल्याने शेतकरी(farmer) हातबल झालेला आहे आणि त्यामध्ये हे अनेक एक संकट शेतकऱ्यांवर ओढवलेल आहे त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे. यावेळी बाजारपेठ मध्ये टोमॅटो(tomato) असो किंवा कोबी आणि इतर पालेभाज्या यांचे सर्व भाव पडलेले आहेत. आणि तयार या अळीचे संकट ओढवल्यामुळे शेतकरी कृषी1विभागाला विनंती करत आहे की लवकरात लवकर यावर कोणता तरी उपाय काढा नाहीतर पूर्ण पीक मरून जाईल. यामुळे कृषी  विभाग अत्ता  या अळीवर कोणता उपाय काढत आहे त्यावर तेथील परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शेतकऱ्यांना अशी आशा आहे की लवकरात लवकर या किडीवर पर्याय निघत लावलेले पीक वाचेल.

English Summary: larvae infest maize crop, farmers fail even after spraying expensive drugs Published on: 06 September 2021, 08:09 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters