कोरोना साथीमुळे जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडली, त्यामध्ये भारतही अपवाद नाही. यावेळी अनेक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, मात्र या संकटाच्या वेळी कृषी क्षेत्राने अनेकांना रोजगाराचा आधार दिला. कोरोना काळात विविध क्षेत्रातील अंदाजित १.५० कोटीहून अधिक लोकांनी आपली नोकरी गमावली होती. पण भारत हा कृषी प्रधान देश असल्याने अनेकांना कृषी क्षेत्रात संधी उपलब्ध झाली.
मागील ३ वर्षात कृषी क्षेत्राने १.१० कोटी लोकांना रोजगाराची संधी दिली आहे, यामध्ये २०१९-२० मध्ये ३१ लाख २०-२१ मध्ये ३४ लाख तर २१-२२मध्ये अंदाजित ४५ लाख लोकांना कृषी क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. कृषी क्षेत्रातील रोजगार हा इतर क्षेत्रांना मागे टाकणारा आहे.
कोरोना काळात अर्थव्यवस्थेत ६.३ टक्क्यांनी घसरण होत असताना कृषी क्षेत्राची ३.३ टक्यांनी वाढ झाली. २० टक्क्याहून अधिक कृषी क्षेत्राची हिस्सेदारी देशाच्या जीडीपी मध्ये आहे. देशाच्या विकासात कृषी क्षेत्राचा मोठा वाट असून, कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत अजूनही शेतकरी आशादायक आहेत.
भारत हा कृषी क्षेत्रात निर्यात करणारा मोठा देश असून प्रामुख्याने भारत गहू तांदूळ निर्यात करतो परंतु योग्य नियोजनाच्या अभावे कृषी क्षेत्राला मोठा तोटा होतो. सध्या रासायनिक खते व औषधांच्या किमती वाढत आहेत त्यामुळे आपण सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे.
योग्य पद्धतीने शेती केल्यास व ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यास ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करता येऊ शकते. आजही रोजगारासाठी ग्रामीण भागातून लोक शहरात स्थलांतरित होत आहेत, त्यामुळे ग्रामीण भाग ओस पडतोय तर शहरांचा श्वास कोंडतोय त्यामुळे ग्रामीण भागात कृषी उद्योग उभे करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या
ऐका बुलडोझरची कहानी! काय आहे बुलडोझरचे खरे नाव आणि केव्हा झाले पहिल्यांदा हे यंत्र तयार?
शरद पवार ऊस उत्पादकांना डोळ्यासमोर न ठेवता त्यावर प्रक्रिया करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात
Share your comments