पुणे
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कांबळवाडी गावातील टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोमुळे लखपती झाले आहेत. या शेतकऱ्याला टोमॅटो पिकातून २० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला आर्थिक फायदा झाला आहे.
मागील चार वर्षात या शेतकऱ्याचे टोमॅटो पीक तोट्यात जाते होते. पण यंदा दर चांगला असल्याने मागील चार वर्षाचा तोटा टोमॅटोने भरुन दिला आहे. पुरंदरमधील कांबळवाडी येथील शेतकरी अरविंद काळभोर यांनी मे महिन्यात साधारण सव्वा एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती.
यंदा पाऊस कमी आणि टोमॅटोची आवक कमी असल्याने बाजारभाव चांगला आहे. काळभोर यांना आतापर्यंत १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर यापुढे त्यांना आणखी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, टोमॅटोचे वाढलेले दर यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं आता टोमॅटोच्या दरात काहीशी घसरण झाली आहे.
तसंच केंद्राने आयातीचा घेतलेल्या निर्णयावर शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. जेव्हा पालेभाज्यांचे दर पडतात? पावसामुळे नुकसान होते तेव्हा सरकार कुठे जाते? असा सवाल देखील शेतकरी उपस्थित करत आहेत.
Share your comments