बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळी बोनस, हसन मुश्रीफ यांची माहिती
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी आहे. राज्यातील बांधकाम कामगारांना दिवाळीला बोनस देण्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास व कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
बांधकाम कामगारांना दिवाळी साठी पाच हजार रुपये बोनस देणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी ही घोषणा कागल येथे बोलत असताना केली.महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना च्या वतीने आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाला संबोधताना हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली.
याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोनस देण्यासंदर्भात प्रस्ताव दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.बांधकाम कामगार सेनेच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चाला संबोधित असताना मुश्रीफ यांनी यासंदर्भात घोषणा केली.
यादरम्यान दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील बांधकाम कामगारांनापाच हजार रुपये बोनस देणार असल्याचे जाहीर केल्यानेमोर्चातील कामगारांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विजयाच्याघोषणा दिल्या.
English Summary: labour welfare minister hasan mushrif declare 5000 thousand bonus for construction labourPublished on: 24 October 2021, 08:02 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments