यांच्या संयुक्त विद्यमाने दि १७ सप्टेंबर, २०२१ रोजी कृषि विज्ञान केंद्र अकोला येथे पोषणवाटिका माह अभियानांतर्गत पोषण मूल्य, आरोग्यदाई पोषणबाग व पोषण थाली, बायोफोर्टीफाईड भरड धान्य, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उमेश ठाकरे, वरिष्ठ शस्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, अकोला तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, अकोला, सौ. कीर्ती देशमुख, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, अकोला, सौ. वीणा नेरकर, पर्यवेक्षिका, एकात्मिक बाल विकास कार्यालय, अकोला व श्री. सागर मेहेत्रे, प्रक्षेत्र अधिकारी, इफको, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. उमेश ठाकरे, वरिष्ठ शस्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांनी कृषी विज्ञान केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या व वेगवेगळ्या उपक्रमाचा लाभ घेऊन ग्रामीण महिला व शेतकरी महिला यांनी आपले हित साधावे याकरिता उपलब्ध संधीबाबत मार्गदर्शन केले.सौ. वीणा नेरकर, पर्यवेक्षिका, एकात्मिक बाल विकास कार्यालय, अकोला यांनी महिलांना पोषणाचे महत्व व पोषण बागेचा प्रसार व अवलंब जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा या करिता अंगणवाडी सेविकांनी आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडावी असे आव्हान केले. सौ. कीर्ती देशमुख, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांनी न्युट्री थाली या विषयावर मार्गदर्शन करतांना आहार, अन्नघटकयुक्त पदार्थ, आहार आयोजन, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोषण बागेचे महत्व, बायोफोर्टीफाईड भरड धान्य या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री. गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांनी फळ व भाजीपाला यांचे आहारातील महत्व विषेद केले तसेच सुदृढ आरोग्यासाठी महिलांनी पोषणबाग तयार करून आहारामध्ये विषमुक्त भाजीपाल्याचे महत्व पटवून दिले. यावेळी श्री. सागर मेहेत्रे यांनी इफको द्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.
कृषी विज्ञान केंद्र, अकोला व इफको मार्फत अंगणवाडी सेविका व शेतकरी महिला यांना रोपे, पोषण बागेचे बियाणे वाटप करण्यात आले व कृषी विज्ञान केंद्र, अकोलाच्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले. महिलांनी कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावरील पोषण बागेची पाहणी केली.
अंगणवाडीमध्ये पोषणबाग तयार करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, अकोला वेळोवेळी मदत करण्यास तत्पर राहील अशी ग्वाही देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
प्रतिनिधी- गोपाल उगले
Share your comments