मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विजेचा धक्का बसून वाहतूकदार जखमी झाला आहे. मुंबई बाजार समितीच्या धान्य बाजारात काल ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत निरज नामक वाहतूकदाराला विजेचा धक्का लागून शरीरावरील काही भागाची त्वचा जळाली आहे. धान्य बाजारातील एल पाकळीच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या वापरासाठी निरज जात होता. त्यावेळी शौचालयाच्या बाजूला बाजारपेठेचे विद्युत सबस्टेशनमध्ये मोठ्या आवाजासह शॉर्ट सर्किट होऊन निरज यांना दुखापत झाली.
त्यांना काही कळण्याच्या आता त्यांच्या शरीराला आगीने लपेट्यात घेतले. त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून पुढील उपचार सुरु आहेत. या ठिकाणच्या विद्युत सबस्टेशन अतिशय दुरावस्थेत आहे. या प्रकाराबाबत धान्य बाजारातील व्यापाऱ्यांकडून बाजार समिती प्रशासनाला वारंवार तक्रारी करून देखील याकडे दुर्लक्ष केल्याने ही गंभीर घटना घडली. तर घडलेल्या प्रकाराबाबत बाजार घटक संतप्त झाले असून अभियंता विभागाविरोधात धान्य व्यापारी आक्रमक झाले आहेत.
गेली अनके वर्षांपासून या विद्युत सबस्टेशनच्या केबल उघड्यावर आहेत. शिवाय व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर अनेक वेळा अभियंता विभाग येथे पाहणी करून गेला आहे. आजही या ठिकाणाची अवस्था 'जैसे थे' असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या घटनेने बाजार घटक भयभीत झाले असून आजच्या घटनेत निरज वाचला असला तरी भविष्यात कोणाचा ना कोणाचा जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सबस्टेशन त्वरित दुरुस्त करण्याची मागणी व्यापारी करत आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजर समिती म्हणून बिरुदावली मिरवणारी बाजार समितीचा भोंगळ कारभार या निमित्ताने पुढे आला आहे. आम्ही धान्य व्यापारी मुंबई बाजार समितीला वार्षिक जवळपास १५ ते २० कोटी रुपयांचा सेस देतो तरी सुद्धा आम्हाला मूलभूत आणि योग्य सुविधा मिळत नाहीत. या विद्युत सबस्टेशनबाबत आतापर्यंत सुमारे ५० वेळा एपीएमसी प्रशासनाला पत्र व्यवहार केला आहे.
असे असताना मात्र, प्रशासन कुंभकर्ण झोपेत असल्याचे धान्य व्यापारी आणि ग्रोमा संस्थेचे सचिव भिमजी भानुशाली यांनी सांगितले आहे. तर सदर घटनेला गांभीर्याने घेऊन बाजारपेठेतील कामे न झाल्यास प्रशासनाविरोधात मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे. यामुळे दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना!! मुंबई APMC बाजारात शेतमाल पडून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
बैल उधळले मात्र तिने वेसण सोडली नाही, बैलगाडा जुंपणाऱ्या रणरागिणीचे राज्यात होतय कौतुक..
बड्या नेत्यांच्या संस्थांना 100 कोटींची व्याजमाफी, स्वाभिमानीचे कार्यकर्ते बँकेत घुसले आणि...
Share your comments