1. बातम्या

कृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार

KJ Maharashtra
KJ Maharashtra

 सहकार विकास महामंडळ बरोबर झालेल्या करारामुळे राज्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळेल, तसेच शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होण्याची संधी मिळेल  व त्यातून आर्थिक स्तर उंचावेल, असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

    महाराष्ट्रातील कृषी पर्यटनाला चालना मिळावी व त्याचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य  पर्यटन महामंडळ आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

. तसेच शुक्रवारी(ता.11) पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील श्री एकवीरा देवी मंदिर तसेच राजगड किल्ला येथे रोप-वे मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता अहवाल तयार करणे, निविदा व्यवस्थापन प्रक्रिया राबवणे यासाठी देखील भारतीय पोर्ट करेल व रुपये महामंडळ यांच्यासोबत पर्यटन संचालनालयाचा सामंजस्य करार करण्यात आला.या कार्यक्रमाला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळाचे संचालक अनिल कुमार गुप्ता इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी बोलताना राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या की, कोरोनामुळे दीड वर्षापासून प्रत्यक्षात पर्यटन बंद असले तरी भविष्यात  राज्यातील पर्यटनाला चालना देण्याचे अनुषंगाने विभागाने अनेक निर्णय घेतले आहेत. राज्याचे बीच शॅक धोरण, कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. 

तसेच प्रधान सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषद आयोजित करून आपण जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. जास्त सुमारे वीस ते पंचवीस देशांच्या प्रतिनिधी हजेरी लावली होती. रोपवे व कृषी पर्यटन या दोन तीन प्रकल्पांसाठी आय पी आर सी एल आणि एमटीडीसी यांच्या माध्यमातून राज्याच्या पर्यटनात महत्त्वपूर्ण भर पडेल..

 

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters