महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी केली आहे. नाईक यांची कामगिरी लक्षात घेऊन वसंतराव नाईक यांच्या जंयतीनिमित्त राज्यात दरवर्षी १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यातील शेतकरी समुद्ध आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याचे स्वप्न वसंतराव नाईक यांनी पाहिले होते. त्यासाठी राज्य सरकारकडून १ जुलै ते ७ जुलैपर्यंत कृषी संजविनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाचा आज तिसरा दिवस आहे.
आजच्या काळात बळीराजा आर्थिकदृष्ट्या स्वंयपूर्ण होणे फार आवश्यक आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना अद्यावत कृषी तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. यासाठी कृषी संजीवनी सप्ताहांच्या माध्यामतून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे हे कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांना भेटून, खते, सुधारित, बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती शेतकऱ्यांना देत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो सर्वदृष्टीने संपन्न व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारच्या मार्गदर्शानाखाली १ जुलै ते ७ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जात आहे. यामध्ये पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या त्रिसुत्रीचा वापर कृषी विभाग करणार आहे. यासाठी कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील.
काय असेल या उपक्रमात
दरम्यान उपक्रम चालू होऊ तीन दिवस झाले आहेत. कोल्हापरसह विविध जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात काय असणार याची माहिती आपण घेऊ. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांना पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीचा अवलंब केला जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या सप्ताहांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांनी दररोज किमान एका गावातील तर उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे आहे.
Share your comments