1. बातम्या

कृषी जागरणकडून जागतिक महिला दिवस साजरा; दिला #इच फॉर इक्वल' चा संदेश

नवी दिल्ली: दरवर्षाप्रमाणे यावर्षीही जगभरात आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. कृषी जागरण या संस्थेतही जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
दरवर्षाप्रमाणे यावर्षीही जगभरात आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला जात आहे. कृषी जागरण या संस्थेतही जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कृषी जागरणचे सहकारी उपस्थित होते. ''कृषी जागरण नेहमी महिला शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तत्पर आहे. आणि पुढेही करत राहू. कारण महिला सशक्तिकरणानेच एक सशक्त राष्ट्र निर्माण होऊ शकते'', असे प्रतिपादन कृषी जागरणच्या संचालिका शाइनी डॉमिनिक ह्यांनी केले.

तर कृषी जागरणचे मुख्य संपादक एम.सी. डॉमिनिक यांनी यावेळी 'इच फॉर इक्कल' चा संदेश दिला.  'आताच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मग ते कृषी क्षेत्र असो किंवा अन्य दुसरे. महिलांच्या सहयोगामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असल्याचे, सुतोवाच एम.सी. डॉमिनिक यांनी यावेळी केले.

याप्रसंगी कृषी जागरणचे ऑपरेश हेड संजय कुमार यांनी आपले मत मांडले. आपण सर्वजण जाणून आहोत की, 'भारत एक कृषी प्रधान देश आहे. आणि कृषी या क्षेत्रात महिला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपले योगदान देत असतात. त्यात आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त #इच फॉर इक्वल ची थीम योग्य आहे. महिलांना सर्व अधिकार मिळाले पाहिजेत जे पुरुषांना आहेत,'' असे ते म्हणालेत.

कृषी जागरणचे मार्केटिंग प्रेसिडेंट रवींद्र कुमार तेवतिया यांनीही आपले मत मांडले. 'कृषी क्षेत्रात ग्रामीण महिलांचा मोठा सहभाग असतो. पेरणीपासून ते काढणीपर्यंतचे सर्व कामे त्या मन लावून करत असतात. सध्याच्या काळात त्यांच्या उपयोगी येतील,असे उपकरण बनवले पाहिजेत. जेणेकरुन त्या अजून कुशलतेने काम करू शकतील', असे मत रवींद्र कुमार तेवतिया यांनी व्यक्त केले. कृषी जागरणचे वरिष्ठ वीपी चंद्र मोहन यांनीही आपले मत याप्रसंगी व्यक्त केले. 'कृषी क्षेत्रातील महिलांच्या योगदानाला दुर्लक्षित करता येणार नाही. कृषीमधील त्यांच्या सहयोगाची दखल घेऊनच कृषी जागरणने मार्च महिन्याचा अंक महिला सशक्तिकरणावर काढला आहे. या अंकात यशस्वी महिला शेतकऱ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे', असे ते म्हणालेत.

जागतिक महिला दिवसाची थीम #इच फॉर इक्वल

यावर्षी जागतिक महिला दिवस या मोहिमेची थीम ही #इच फॉर इक्वल आहे. या थीमच्या मागे एक उद्देश असून समाजाला एक संदेश दिला जात आहे. पुरुष असो किंवा महिला सर्व एक समान आहेत. सध्याच्या काळात काही देश सोडता महिलांना त्यांचे मुलभूत अधिकार, मतदान आणि शिक्षणांचा अधिकार मिळाले आहेत. परंतु अजून अशा काही महिला आहेत की, त्यांना अजून अधिकार मिळालेले नाहीत. दरम्यान आपल्या देशातील परिस्थिती बदलत आहे. महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मग ते कृषी क्षेत्र असो किंवा सिनेसृष्टी, अभियांत्रिकी किंवा वैद्यकिय क्षेत्र असो. महिलांच्या सहयोगामुळे प्रत्येक क्षेत्रात उन्नती होत आहे. जर जगभरातील ग्रामीण महिलांचे कृषी क्षेत्रात ५० टक्के योगदान आहे. म्हणजे अन्न उत्पादनात महिलांचा मोठा हिस्सा आहे. सध्या अशा अनेक महिला आहेत, ज्या आधुनिक पद्धतीने शेती करुन लाखो रुपये कमवत आहेत. आणि इतर महिलांना रोजगारही देत आहेत. महिलांच्या या योगदानाची दखल घेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवून त्यांना प्रोत्साहित करत आहेत.

जागतिक महिला दिवस

पहिला जागतिक महिला दिवस १९०९ मध्ये साजरा करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्र संघ १९७५ पासून हा दिवस साजरा करत आहे. जगातील विविध भागात महिलांविषयी सन्मान, प्रशंसा, आणि प्रेम व्यक्त केले जाते. या दिवशी महिलांच्या आर्थिक, राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला याची पण जाणिव करुन देतो की, महिलांनी अनेक सामाजिक आणि इतर बंधनांना झुगारुन आपलं एक स्थान निर्माण केले आहे. आजच्या तारखेला महिला प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करताना दिसतात. परंतु आपण मागे वळून पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, आधीच्या काळात महिलांना इतके अधिकार नव्हते. महिलांना आज जितके स्वातंत्र्य मिळाले आहे तितके आधी नव्हते. आधी त्या शिक्षण घेऊ शकत नव्हते किंवा नोकरी करु शकत होते. त्यांना मतदान करण्याचा अधिकारही नव्हता.

जागतिक महिला दिनाची सुरुवात कशी झाली

१९०९ : च्या २८ फेब्रुवारीला अमेरिकेत हा दिवस साजरा करण्यात आला होता. सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने न्यूयॉर्कमध्ये १९०८ मध्ये कामगाराच्या उपोषणाला सन्मान देण्यासाठी या दिवसाची निवड करण्यात आली. कारण या दिवशी महिला आपल्या कामाचे तास कमी आणि चांगल्या वेतनाचा आपला हक्क मागू शकतील.  

१९१३-१४ : मध्ये महिला दिवस युद्धाच्या विरोधातील एक प्रतिक म्हणून समोर आले. रुसच्या महिलांनी पहिल्यावेळेस जागतिक महिला दिवस फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस साजरा केला. आणि पहिल्या विश्व युद्धाच्या विरुद्धात आपला विरोध व्यक्त केला. युरोपमध्ये महिलांनी ८ मार्चला शांतता कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी रॅली काढली होती.

१९७५: संयुक्त राष्ट्रने ८ मार्च १९७५ पासून महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. १९७५ हे पहिले वर्ष होते. जेव्हा जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.
 

English Summary: krishi jagran celebrate world women's day with each far equal messages Published on: 07 March 2020, 06:59 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters