भारत कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात अग्रेसर आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेती व्यवसाय करून आपली उपजीविका करत आहे. सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात अमुलाग्र बदल घडून आले आहेत शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अन्य पिकांबरोबरच फळशेती आणि फुलशेती चे प्रमाण सुद्धा वाढले आहे.
राज्यात तसेच देशामध्ये सर्वाधिक आंब्याचे उत्पन्न हे कोकणात घेतले जाते. कोकणातील सिंधदुर्ग रत्नागरीती मालवण ठाणे पालघर या जिल्ह्यात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. शिवाय या जिल्ह्यातील आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे. या आंब्याची निर्यात देशात तसेच बाहेरील देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. तसेच आता शासनाने कोकणातील आंब्यांना विमा देण्याचे ठरवले आहे. या योजनेमध्ये पाच वर्षे वय झालेल्या आंबा पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
हेही वाचा:-जाणून घ्या, अन्न तंत्रज्ञान उद्योगात करिअरच्या वाढत्या संधी, करू शकता जबरदस्त करियर.
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता
शासनाने आंबा फळासाठी विमा योजना सुरू केली आहे या मध्ये जर का फळांचे नुकसान झाल्यास प्रत्येक आंबा उत्पादक शेतकरी वर्गाला विमा देण्याचे ठरले आहे या योजेअंतर्गत जर का अवेळी पाऊस , कमी/ जास्त तापमान 1400 --- 7 हजार ते 29 हजार एवढी रक्कम देण्यात येईल तसेच जर का ऐन हंगामाच्या काळात गारपीट झाल्यास 46600 ते 46000 एवढी रक्कम देण्यात येईल.
हेही वाचा:-तुमच्या शरीरात युरिक ऍसिड वाढतेय, हे ४ पदार्थ खावा आणि आणि या समस्येपासून करा सुटका
योजनेच्या अटी:-
1)एक शेतकरी एका वेळी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो. हे शेतकरी वर्गाच्या फायदेशीर आहे.
2) जर का एका शेतकरी वर्गाकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो
3)या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.
4) जे शेतकरी पीककर्ज घेतात किंवा बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
Share your comments