बिहार मधील समस्तीपुर जिल्ह्यातील डॉक्टर राजेंद्र प्रसाद केन्द्रीय कृषि विश्वविद्यालय पुसा द्वारा विकसित केले गेलेले सुखेत मॉडेल चा गाजावाजा देशभरात आहे. या मॉडेल चे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमांमधून केले होते.पुसा केंद्रीय विश्वविद्यालय च्या सूखेत मॉडेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी उज्वला योजना यशस्वी बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरला आहे. या मॉडेलने उज्वला योजना मध्ये क्रांती आणली आहे.
या मॉडेल च्या माध्यमातून शेण आणि कचरा याच्या बदल्यात उज्वला योजना लाभधारकांना मोफत गॅस सिलेंडर दिले जात आहे.या मॉडेलच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदी यांच्या दोन स्वप्नांना पंखमिळणार आहेत.पहिला म्हणजे देशातील माता भगिनींना स्वयंपाक बनवताना होणाऱ्या धुरापासून मुक्ती मिळेल आणि दुसरे म्हणजे स्वच्छता अभियान ही यशस्वी होईल.
काय आहे हे सुखेत मॉडेल?
डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय विश्वविद्यालय पुसाचे कुलपती डॉ. रमेशचंद्र श्रीवास्तव यांनी स्वच्छता मिशन अभियान आणि उज्वला योजना यांना समोर ठेवून केलेल्या अभ्यासानंतर शेन आणि कचऱ्यापासून वर्मी कंपोस्ट तयार करण्याची योजना बनवली आहे.
या योजनेची सुरुवात सगळ्यात अगोदर मधुबनी जिल्ह्यातील सुखेत गावापासून झाली. त्यामुळे या मॉडेलला सुकेत मोडेल असे म्हणतात.पूसाकृषिविश्वविद्यालययावैज्ञानिकांनीया गावात एका शेतकऱ्याचे शेत घेतले. त्यानंतर उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या घरून काडी कचरा आणि शेन 20 20 किलो प्रत्येक दिवशी जमा केले.त्यानंतर या वैज्ञानिकांनी जमा केलेल्या या शेन आणि कचऱ्यापासून वर्मीकंपोस्ट तयार करणे सुरू केले. त्याची किंमत बाजारात 600 रुपये प्रति क्विंटल आहे.या तयार जैविक खतापासून मिळालेल्या उत्पन्नातून उज्वला योजनेचे लाभार्थी परिवारांना कचरा आणिशेणाच्याबदल्यात दोन महिन्यांचा गॅस सिलेंडर मोफत देणे सुरू केले. याचा फायदा असा झाला की ज्या उज्ज्वला योजना लाभार्थी महिला पैशांच्या अभावी गॅस सिलेंडर भरू शकत नव्हत्या त्यांना आत्ता ते रिफिलिंग करणे शक्य झाले.
तसेच गावातील पंधरा लोकांना या योजनेच्या माध्यमातून रोजगारही मिळाला आहे.
बिहारच्या मधुबनी जिल्ह्या मध्ये डॉ. राजेंद्रप्रसाद केंद्रीय विद्यालय पुसा समस्तीपुर मध्ये सुकेत मॉडेल योजना यशस्वी झाली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये देशातील प्रत्येक पंचायत क्षेत्रात ही योजना लागू करण्याविषयी बोललेआहेत. यानंतर पुसा विश्वविद्यालय बिहारच्या मोकामा आणि सुपौल या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात ही योजना चालू करण्याची तयारी करीत आहे.
Share your comments