1. बातम्या

प्रत्येक ऋतूत बाजार असणारे किवीचे फळ, होईल लाखोंचा फायदा..

आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. अनेक राज्यात अनेक वेगवेगळी पिके घेतली जातात. काही शेतकरी हे पारंपरिक शेतीच करतात, तर अनेक शेतकरी आपल्या शेतात अनेक वेगवेगळे प्रयोग करून मोठे उत्पन्न कमवतात. यामध्ये ते अनेक नवनवीन तंत्रज्ञान वापरतात.

kiwi

kiwi

आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. अनेक राज्यात अनेक वेगवेगळी पिके घेतली जातात. काही शेतकरी हे पारंपरिक शेतीच करतात, तर अनेक शेतकरी आपल्या शेतात अनेक वेगवेगळे प्रयोग करून मोठे उत्पन्न कमवतात. यामध्ये ते अनेक नवनवीन तंत्रज्ञान वापरतात. सध्या आरोग्यसाठी किवीचे फळ उपयुक्त ठरते.

यामुळे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे याच्या शेतीमधून अनेक शेतकरी लाखो रुपये कमवतात. अरुणाचल प्रदेशातील जीरो घाटी जंगलात मोठ्या प्रमाणावर याची शेती केली जाते. सुरुवातीला वीस वर्षीपूर्वी मिळणाऱ्या किवी फळाकडे कुणाचे लक्षही गेले नव्हते. मात्र आता शेतकरी यामधून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवतात.

या फळाला सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करून देण्यात आला आहे. देशाच्या उत्पादनात किवी शेतीचा 50 टक्के वाटा आहे. अरुणाचल प्रदेशातील शेतकरी वर्षाला 8 हजार मेट्रीक टनाचे उत्पादन घेतात.

अरुणाचल प्रदेशात फळ, हळदीचे आणि संत्री पिकवली जात असली तरी देशाला ओळख करून देणारे स्वतःची अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी किवी फायदेशीर झाला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. अनेक कुटूंब या शेतीवरच आवलंबून आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.

सध्या ज्या राज्यात किवीचे उत्पादन घेतले जाते त्या राज्यांसाठी केंद्राच्या कृषी मंत्रालयाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. स्थानीक पातळी खाण्यासाठी म्हणून 2 हजार रूपयामध्ये या फळाला व्यावसायिकतेचा दर्जा देण्यात आला होता.

येथील शेतकऱ्यांनी त्यावर प्रचंड मेहनत घेऊन त्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. अरुणाचल प्रदेशाची उंची समुद्र सपाटीपासून पंधराशे ते दोन हजार किलोमीटरवर आहे, मात्र हीच उंची किवी फळासाठी आदर्शवत आहे.

2000 सालाच्या मध्यापासून हे फळ बाजारात उपलब्ध करण्यात आले. डोंगराळ प्रदेश किवीसाठी योग्य असल्याने किवी फळ वेलीवर फुल यावे तशी या फळाचे उत्पादन येते. यामुळे याकडे शेतकरी वळाले आहेत.

अनेक आजारांवर हे फळ उपयुक्त आहे. यामुळे त्याची मागणी वाढतच आहे. देशातील जवळपास सगळ्याच राज्यातून याला मागणी आहे. यामुळे हे फळ कोणत्याही ऋतूत बाजारभाव मिळवून देते. यामुळे या राज्यात याला मोठी मागणी असते.

English Summary: Kiwi fruit, which has a market in every season, will benefit millions. Published on: 24 January 2022, 09:57 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters