आजच्या काळात किवी फळाला जगात किती महत्व प्राप्त झाले आहे हे तुम्हाला माहीतच आहे. किवी फळ २० वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेश मधील जीरो घाटी जंगलात मिळाले होते मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले न्हवते. मात्र आजच्या घडीला किवी फळाकडे सर्वजण व्यावसायिक दृष्ट्या पाहत आहेत. युक्रेन देशामध्ये जगात वर्षाला जास्त म्हणजेच ८ हजार मेट्रिक टन किवी चे उत्पादन घेतले जाते. आपल्याकडे आंबा तसेच संत्री ची शेती चांगल्या प्रकारे केली जाते. अरुणाचल प्रदेशमधील शेतकरी प्रति वर्ष ८ हजार मेट्रिक टन किवीचे उत्पादन घेत आहेत.
किवीच्या शेतीसाठी केंद्र सरकारच्या योजना :-
किवी फळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी लोअर सुबनसिरी जिल्ह्यामध्ये किवी संशोधन संस्थेची उभारणी सुद्धा केली आहे. किवी फळ भविष्यातील व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारे फळ मानले जाते. एकेकाळी आपला देश या फळासाठी दुसऱ्या फळावर अवलंबून होता व आज जगात सर्वात जास्त किवी चे उत्पादन आपल्या देशात घेतले जात आहे. जया ज्या राज्यात किवी चे उत्पन्न घेतले जाते त्या राज्यांसाठी कृषी मंत्रालयाकडून विविध योजना आखल्या जात आहेत.
कित्येक वर्षांनी प्रमाणित :-
मागील तीन वर्षांपूर्वी च सुबनसिरी जिल्ह्यात मिळणाऱ्या किवी फळाला मान्यता मिळाली होती. सुबनसिरी जिल्ह्याचे फलोत्पादन अधिकारी कोमरी मुर्टेम यांनी सांगितले की सेंद्रीय प्रमाणीकरणाचे अनेक फायदे आहेत जसे की वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठा व प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान्यता मिळालेल्या फळाला स्थान मिळवण्यासाठी फायदा होतो.
अरुणाचल प्रदेशातून मोठे उत्पादन :-
अरुणाचल प्रदेशात स्थानिक पातळीवर हे फळ खाण्यासाठी २ हजार रुपयाने व्यावसायिक दर्जा दिलेला आहे परंतु येथील शेतकरी या फळाची शेती करण्यासाठी खूप परिश्रम घेत आहे. समुद्रसपाटीपासून अरुणाचल प्रदेशाची उंची १५००-२००० किमी वर आहे. किवी फळासाठी ही उंची फायद्याची आहे. २००० सालापासून किवी फळ बाजारात उपलब्ध झाले आहे. किवी फळाच्या उत्पादनासाठी डोंगराळ भाग योग्य आहे.
देशभरातून मागणी; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ :-
किवी फळाला लोकमान्यता मिळावी यासाठी २०२० साल उजडावे लागले कारण या फळाला सेंद्रिय प्रमाणपत्राची गरज होती आणि ते प्रमाणपत्र आता मिळाले त्यामुळे याचा फायदा या फळाला भविष्यात होणार आहे. देशाची राजधानी दिल्ली बरोबरच इतर शहरात सुद्धा किवी फळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
Share your comments