आजच्या डिजिटल युगात प्रयोगातून नवनवीन शोध लावले जात आहेत. त्याचप्रमाणे, भारतात शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि स्मार्ट बनवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी तयार केलेले "किसान सभा" मोबाईल अँप आहे. ज्यामध्ये कापणीपासून ते बाजारात विकण्यापर्यंतची माहिती असते. याद्वारे शेतकरी घरी बसून आपले पीक बाजारामध्ये विकू शकतात.
"किसान सभा" मोबाईल अँप
कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकांचे योग्य व्यवस्थापन न केल्याने शेतात पडलेल्या पिकाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना त्यांची पिके बाजारात नेण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत असताना, ही समस्या लक्षात घेऊन CSIR-Central Road Research Institute (CSIR-CRRI) ने "किसान सभा" मोबाईल अँप विकसित केले आहे. ज्याद्वारे शेतकरी घरी बसून शेतमाल बाजारात विकू शकतात.
राज्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजाची लगबग वाढली
“किसान सभा” मोबाईल अँपची उद्दिष्टे
१. हे पोर्टल शेतीशी संबंधित आहे.
२. “किसान सभा” मोबाईल अँप वाहतूकदार, मंडी डीलर, ग्राहक (जसे की मोठी किरकोळ दुकाने, ऑनलाइन स्टोअर्स, संस्थात्मक खरेदीदार) आणि इतर संबंधितांना वेळेवर आणि चांगला शेतमाल देते.
३. "किसान सभा" कृषी सेवा क्षेत्रातील लोकांसाठी देखील कार्य करते जसे की खत/कीटकनाशकांचे विक्रेते, जे त्यांच्या सेवांसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात.
४. हे कोल्ड स्टोअर्स किंवा गोदामांशी संबंधित लोकांसाठी देखील उपयुक्त ठरेल. किसान सभा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते.
५. किसान सभेकडे शेतकरी/मंडी डीलर्स/वाहतूकदार/मंडी बोर्ड सदस्य/सेवा पुरवठादार/ग्राहकांची देखभाल करणारे 6 प्रमुख मॉड्यूल आहेत.
7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! डीए सोबत 'या' चार भत्त्यात होणार भरमसाठ वाढ
किसान सभेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना सर्वात किफायतशीर आणि वेळेवर मदत देणे आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी करून आणि संस्थात्मक खरेदीदारांशी थेट संपर्क साधून त्यांच्या नफ्याचे प्रमाण वाढवणे हा आहे. जवळच्या मंडईंची तुलना करून, स्वस्त दरात माल वाहनाची बुकिंग करून पिकांचा सर्वोत्तम बाजार दर उपलब्ध करून देण्यात मदत होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल.
किसान सभा अँप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरून अँप डाउनलोड करू शकता किंवा दिलेल्या https://play.google.com/store/apps/details?id=com.SarvodayaVentures.KisanSabha.com&hl=en_IN&gl=US लिंकवर क्लिक करू शकता.
Share your comments