काळाच्या बदलानुसार शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन तर वाढवत आहे मात्र योग्य बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना मोबदला भेटत नाही. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून आता बाजापेठ जवळ करण्याचा निर्णय घेतला जात आहे. किसान रेल ची शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे. किसान रेलमुळे देशात प्रसिद्ध तसेच भौगोलिक मानांकन मिळालेले डहाणूतील घोलवड आणि परिसरातील चिकू फक्त २४ तासांमध्ये दिल्ली च्या बाजारपेठेत पोहचले आहेत. चिक्कूला योग्य ती बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
वर्षभरात 35 हजार टन चिक्कूची वाहतूक :-
पालघर भागात चिक्कूचे मोठ्या प्रमाणत उत्पन्न घेतले जाते परंतु जवळपास बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळत न्हवता. किसान रेलमुळे फक्त २४ तासात चिक्कू दिल्ली च्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. २४ तासात हे फक्त किसान रेलमुळे शक्य झाले असल्याने चिक्कू चा दर्जा ही टिकून राहिला आहे तसेच दर सुद्धा चांगला मिळाला आहे. पश्चिम रेल्वेच्या किसान रेलमधून गेल्या वर्षी १२३ ट्रेनमधून जवळपास ३५ हजार टन चिकू दिल्ली ला पोहचवण्यात आले आहेत. किसान रेल सुरू करण्याआधी ट्रकद्वारे वाहतूक करावी लागत होती ज्यास ३२-३५ तास लागत असायचे.
डहाणू चिक्कूला परदेशातही मागणी :-
पालघर जिल्ह्यातील डहाणू, वाणगाव, घोलवड येथील चिक्कू देशात प्रसिद्ध मानले जातात ज्या चिक्कूस परदेशात सुद्धा मोठी मागणी आहे. कोरोना काळात मात्र या नाशवंत चिक्कूनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. चिक्कू हे फळ नाशवंत फळ आहे जे की योग्य वेळेत जर हे फळ बाजारपेठेत पोहचले नाही तर काहीच उपयोग होत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांना, व्यापारी वर्गाला व चिक्कूप्रेमींना फटका बसतो. पालघर मधील चिक्कूना भौगोलिक मानांकन भेटले असल्यामुळे या चिक्कूची चव च वेगळी आहे.
वेळेत अन् खर्चातही बचत :-
किसान रेलमुळे पालघर जिल्ह्यातील चिक्कू उत्पादकांचा वाहतुकीचा तसेच बाजारपेठेचा प्रश्न मार्गी लागला आहे जसे की योग्य बाजारपेठ ही मिळाली आणि वेळेची सुद्धा बचत झाली. किसान रेल सुरू करण्याआधी हा माल ट्रकद्वारे नेहला जात असायचा ज्यास सुमारे ३४-३५ तास लागायचे. किसान रेलमुळे यामध्ये १२ तासाची बचत म्हणजेच आता २४ तासात हा माल वाहतूक करणे शक्य झाले आहे.
Share your comments