केंद्र सरकारचे किसान संवाद अभियान देशभर सुरु असून या अभियानाचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरु आहे. त्या अनुषंगाने बारामतीत किसान मोर्चाच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिका-यांची विभागीय बैठक आज पार पडली. यावेळी भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बन्शीलाल गुर्जर यांनी संबंधित उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जीडीपीमध्ये कृषीचा सहभाग वाढविण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही ते म्हणाले.
तसेच गाव तेथे किसान मोर्चा अभियान राबविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी राज्यातील पदाधिकाऱ्यांसह उपस्थितांना त्यांनी केले. तर उर्जावान प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगत वासुदेव काळे यांचे कौतुक केले. महाराष्ट्रातील शेतक-यांच्या विविध मागण्या केंद्रीय कृषी व वाणिज्यमंत्री यांच्याकडे मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी आपल्या भाषणात दिले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदभार स्विकारल्यापासून १० महिन्यात ३५ आंदोलने केल्याचे सांगत किसान मोर्चाचे काम असेच वेगाने सुरु राहणार असल्याचे वासुदेव काळे म्हणाले. आंदोलनांमध्ये पीकविमा, एफआरपी, अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना मदत यासह वीज जोडणीबाबत विषयांची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात, गणेश जगताप आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. किसान मोर्चाच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी दिलासा देखील मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या;
अजब राज्याचे गजब सरकार! फक्त बळीराजाचे राज्य म्हणून जमणार नाही साहेब, विजेचे वास्तव एकदा वाचाच
सोयाबीन खरेदी करताना खासगी व्यापाऱ्यांकडून मापात पाप, धक्कादायक माहिती आली समोर..
Share your comments