1. बातम्या

Kisan Exhibition Pune 2022 : पुणे येथे १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन!

Kisan Exhibition : भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन हे 14 ते 18 डिसेंबर पुण्यात (Pune) होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र भोसरीजवळ मोशी येथे होणार आहे. यात शेतकर्‍यांचा मेळा बघायला मिळणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Kisan Exhibition Pune 2022

Kisan Exhibition Pune 2022

Kisan Exhibition : भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन हे 14 ते 18 डिसेंबर पुण्यात (Pune) होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र भोसरीजवळ मोशी येथे होणार आहे. यात शेतकर्‍यांचा मेळा बघायला मिळणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

15 एकर या प्रदर्शनाचा परिसर असणार आहे. यात 500 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनं सादर करणार आहेत.

प्रदर्शनात 5 दिवसांमध्ये देशभरातून दीड लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, हा किसान प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.

IMD : देशातील 10 हून अधिक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, जाणून घ्या हवामानाची स्थिती

प्रदर्शनात ५ दिवसांमध्ये देशभरातून दीड लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील, असा अंदाज आहे. किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य आणि शेती क्षेत्रातील मान्यवर संस्था यांचा सहभाग अन् सहकार्य लाभणार आहे.

पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार्‍या ८० हून अधिक आस्थापनांचा सहभाग, हे कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल.

किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य आणि शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग आणि सहकार्य लाभणार आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका आणि शेती लघु उद्योग अशी विभागवार दालनं उभी करण्यात आलेली आहेत.

2000 रुपयांची नोट म्हणजे काळा पैसा; मोदींची 2 हजारांची नोट बंद करण्याची मागणी

English Summary: Kisan Exhibition Pune 2022 : India's largest agricultural exhibition from 14th to 18th December in Pune! Published on: 13 December 2022, 11:29 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters