शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट व्हावे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी केंद्र शासन शेतकरी आणि पशुपालकांसाठी विविध प्रकारचे योजना राबवित आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा त्या मागचा उद्देश आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट व्हावे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी केंद्र शासन शेतकरी आणि पशुपालकांसाठी विविध प्रकारचे योजना राबवित आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा त्या मागचा उद्देश आहे.
याच योजनांचा एक भाग म्हणून पशुपालक शेतकऱ्यांना पशुपालनाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता यावे यासाठी एक ते तीन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. या योजनेचा लाभ पशुपालक शेतकऱ्यांना 15 फेब्रुवारी पर्यंत घेता येणार आहे. त्यामुळे या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. केंद्राच्या पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय आणि वित्तीय सेवा विभाग यांच्या माध्यमातून 15 नोव्हेंबर ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये किसान क्रेडिट कार्ड ही राष्ट्रव्यापी मोहीम राबवली जात आहे.
या मोहीमच्या माध्यमातून या योजनेचा प्रसार आणि प्रचार केला जात आहे.
या योजनेतून मिळते तारणाविना 1 ते 3 लाखांपर्यंत कर्ज
या योजनेच्या माध्यमातून पशुपालकांनी किसान क्रेडिट कार्ड घेतले तर पशुपालकांना एक लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. जर पशुपालक शेतकरी हे सहकारी दूध सोसायटी, दूध संघ, दूध उत्पादक कंपनी यांच्याशी संबंधित असतील तर आणि यापैकी कोणीही त्यांच्या कर्ज परतफेडीची जबाबदारी घेत असेल तर तीन लाखांपर्यंत विनातारण कर्ज या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून पशुंची खरेदी नाही तर केवळ व्यवस्थापन केले जावे म्हणून आहे.
योजना पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवली जात असून तिचा थेट लाभ हा पशुपालकांना होणार आहे. या योजनेचा लाभ पशुपालकांना 15 फेब्रुवारी पर्यंत घेता येणार आहे कारण हीच अंतिम मुदत असल्याचे सांगण्यात आले आहे.(संदर्भ-कृषीक्रांती)
Share your comments