शेतकऱ्यांसोबत मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील क्रेडिट कार्ड चा लाभ देण्यासाठी त्यांना शेतकर्यांच्या श्रेणीमध्ये आणून त्यांना ही सुविधा दिली जात आहे. आता शेतकऱ्यांचा सारखे मत्स्य पालकदेखील किसान क्रेडिट द्वारे कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवू शकतात. केंद्र सरकार द्वारा मच्छी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहे आणि डिसेंबर महिन्यापर्यंत सगळ्या मत्स्यपालन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड उपलब्ध केले जाईल.
किसान क्रेडिट कार्ड मुळे मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना होणारा फायदा
किसान क्रेडिट कार्ड द्वारे मत्स्यपालन शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल. किसान क्रेडिट कार्ड द्वारे 43 लाख रुपये पर्यंत कर्ज घेतले तर व्याजदर तसा पाहिला नऊ टक्के आहे परंतु यामध्ये सरकार दोन टक्क्याची सबसिडी देते.पण जर हे कर्ज वेळेत भरले तर वरून तीन टक्के सूट दिली जाते म्हणजे एकंदरीत पाहता हे कर्ज शेतकऱ्यांना फक्त चार टक्के दराने पडते
कोणते मत्स्यपालक शेतकरी घेऊ शकतात किसान क्रेडिट कार्ड?
- देशांतर्गत मत्स्यपालन करणारे आणि ऍक्वाकल्चर मत्स्यपालक
- मत्स्य पालक ( व्यक्तिगत किंवा समूह, भागीदारीत असणारे, भाड्याने जमीन करणारे शेतकरी )
- स्वयंसहायता गट
- महिला गट
हे कार्ड घेण्यासाठी असलेल्या अटी
1-शेतकरी,मत्स्यपालन आणि पशुपालनकरणारा कोणताही शेतकरी जरी तो दुसर्याची जमीन करीत असेल तेयोजनेचा लाभ घेऊ शकतात.
2-
किसान क्रेडिट कार्ड साठी करणाऱ्या अर्जदाराचे वय हे कमीत कमी अठरा वर्षात तर जास्तीत जास्त 75 वर्ष असावी.
3- जर लाभार्थ्याचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला कोअॅपलिकँट लागेल.
- जरशेतकऱ्याचे वय 60 पेक्षाकमीअसेलतर किसान क्रेडिट कार्ड साठी फॉर्म भरताना बँक कर्मचारी ठरवेल की तुम्ही त्यासाठी योग्य आहात की नाही.
- तसेच मत्स्य पालन करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी तलाव,खुला जलाशय,हॅचरी इत्यादी ठिकाणी मासे पकडण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रक्रिया विषयीचे आवश्यक लायसन्स हवे.
Share your comments