यावर्षी बळीराजाला अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे, बळीराजाने यावर्षी खरीप हंगामात अनेक आसमानी संकटाचा सामना केला आहे. खरीप हंगामात अनेक भागात पावसाने दांडी मारली होती, त्यामुळे खरीपचा हंगाम हा लांबला होता.
खरीप हंगामाप्रमाणेच आता रब्बीचा हंगाम देखील निसर्गाच्या लहरीपणामुळे चांगलाच लांबला आहे. आणि जसं की आपणांस ठाऊकच आहे की, पेरा लांबला की याचा सरळ परिणाम हा उत्पादनावर होतो. त्यामुळे खरीप हंगामातील उत्पादन हे देखील शेतकरी राजांना पाहिजे तेवढे मिळाले नाही, तसेच आता रब्बी हंगामातील उत्पादन देखील हे लक्षणीय कमी होण्याची शक्यता शेतकरी बांधव वर्तवत आहेत.
राज्यात बऱ्याच भागात विशेषता मराठवाड्यात रब्बीचा पेरा लांबला आहे, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त रब्बीची पेरणी झाल्याचे समजत आहे. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी रब्बीची पेरणी झाल्याचे समजून येत आहे. रब्बी हंगामात मराठवाडयात फक्त गहुची पेरणी वेळेवर झालेली दिसत आहे, इतर सर्व पिकांची पेरणी हि निसर्गाच्या लहरीपणामुळे लांबली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाच्या मनात उत्पादन कमी होण्याची शक्यता घर करून बसली आहे, पण शेतकरी राजांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे कृषि वैज्ञानिक दावा करत आहेत की जरी रब्बीचा पेरा हा लांबला आहे तरी त्यापासून मिळणारे उत्पादन हे चांगले दर्जेदार राहणार आहे, त्यामुळे निश्चितच शेतकरी राजांना थोडासा दिलासा मिळताना दिसत आहे.
कृषि उपविभागीय अधिकारी राजेंद्र कदम यांनी नुकतीच प्रसार माध्यमात आपले मत व्यक्त केले, त्यांच्या म्हणण्यानुसार जरी रब्बी हंगामात उशिरा पेरण्या झाल्या असल्या तरी या पिकांची योग्य काळजी घेऊन यातून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकची पेरणी झाली आहे, मात्र प्रत्येक्षात याचे वितरण हे खुप असमान आहे, म्हणजे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यात सरासरी पेक्षा जास्त पेरण्या झाल्या आहेत तर बाकी जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पेरा झाला आहे. एकंदरीत कृषि अधिकारी यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे एवढे नक्की.
संदर्भ हॅलोकृषी
Share your comments