नाशिक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली परंतु मृगनक्षत्र लागल्यानंतर पाऊस हा पेरणीयोग्य पडलाच नाही. त्यामुळे अजूनही हव्या तशा पेरण्यांना नाशिक जिल्ह्यात सुरुवात झालीच नाही. नाशिक जिल्ह्याच्या आकडेवारीवरून केवळ 457 हेक्टर क्षेत्रावर मका, बाजरी आणि कपाशीची पेरणी झाली आहे. बळीराजाला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर एकूण नाशिक जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र हे सहा लाख 65 हजार 582 हेक्टर इतके आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असताना मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आनंदाने मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना लागला. नांगरणी, सरी पाडणे वगैरे सगळी मशागतीची कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या भरोशावर पेरणी केली. परंतु मुर्ग नक्षत्र कोरडे जात असल्याने जमिनीत पेरणी योग्य ओल तयार झालेली नाही. त्यामुळे अजूनही खरिपाच्या पेरण्यांना हवा तेवढा वेग आलेला नाही.
ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या भरवशावर पेरण्या पूर्ण केले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 457 हेक्टरवर पेरण्या झाले असून त्यामध्ये बागलान तालुका आघाडीवर आहे. बागलाण तालुक्यात एकूण 156 हेक्टरवर मका आणि जवळजवळ 31 हेक्टर वर बाजरीची पेरणी करण्यात आली आहे.
त्यापाठोपाठ मालेगाव तालुक्यात 20 आणि नांदगाव तालुक्यातील 41 अशी एकूण 270 हेक्टरवर मक्याची पेरणी करण्यात आली आहे. पेरण यांचा तालुकानिहाय विचार केला तर येवला तालुक्यात 147 हेक्टरवर, मालेगाव तालुक्यात 40, नांदगाव तालुक्यात 18 आणि बागलाण तालुक्यात अवघ्या दोन हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. चांदवड, पेठ, सुरगाणा, सिन्नर, दिंडोरी तसेच इगतपूरी तालुक्यांमध्ये अद्याप पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली नाही.
पेठ, सुरगाणा सारख्या आदिवासी तालुक्यांमध्ये शेती तयार करण्यात आली असली तरी पुरेसा पाऊस नसल्याने भाताची रोपे टाकण्यात आलेले नाहीत. कृषी विभागाकडून सल्ला देण्यात आला आहे की, जमिनीत पुरेशी ओल तयार झाल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणी करू नये.
Share your comments