1. बातम्या

खरिपाचा पेरा गेल्यावर्षीच्या तुलनेत २१% नी वाढला

KJ Staff
KJ Staff

पुणे : यावर्षी वेळेवर आलेला मॉन्सून आणि धरणामध्ये असलेल्या अतिरिक्त साठ्यामुळे यंदा १७ जुलैपर्यंत खरिपाचा पेरा मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्ब्ल २१% नी वाढला आहे. मागच्या वर्षी याचा कालावधीत ५७०.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यावर्षी १७ जुलैपर्यंत ६९१.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे.
यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश आहे. मागच्या वर्षी याचा कालावधीत भाताची १४२ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यावर्षी आतापर्यन्त १६८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. तेलबियांची लागवड ११० लाख हेक्टरवरून १५५ लाख हेक्टर एवढी वाढली आहे. कापसाची लागवड ९६ लाख हेक्टरवरून वाढून ११३ लाख हेक्टर झाली आहे.
केंद्र सरकारच्या अनुमानावरून देशात अजूनही काही ठिकाणी पेरणी चालू आहे. यावर्षी देशाच्या सर्वच भागात चांगला पाऊस असून त्यामुळे पिके शेवटपर्यंत टिकून राहण्याचे प्रमाण जास्त राहणार आहे. जर कोणतेही अस्मानी किंवा सुलतानी संकट आले नाही तर यंदा शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळेल अशी अशा आहे. खरिपाच्या १४१ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २० जुलैअखेर १२४ लाख हेक्टर म्हणजेच ८७ टक्क्यांचा आसपास पेरा झालेला आहे. गेल्यावर्षी खरिपाचा याच तारखेपर्यंत पेरा ७० टक्के म्हणजे १०० लाख हेक्टर झाला होता. राज्यात भात, नागलीची पुर्नलागवडीची कामे वेगात सुरु आहेत. उर्वरित पेरण्या प्रगतीपथावर आहेत. सोयाबीन, भुईमूग व मका फुलोऱ्यात आहेत. बागायती कापूस आता पाते धरण्याच्या स्थितीत आहे. बहुतेक भागात निंदणी , कोळपणी इतर आंतरमशागतीची कामे सुरु आहेत, असे अहवालात म्हटले. 

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters