पुणे : यावर्षी वेळेवर आलेला मॉन्सून आणि धरणामध्ये असलेल्या अतिरिक्त साठ्यामुळे यंदा १७ जुलैपर्यंत खरिपाचा पेरा मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्ब्ल २१% नी वाढला आहे. मागच्या वर्षी याचा कालावधीत ५७०.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यावर्षी १७ जुलैपर्यंत ६९१.८६ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे.
यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश आहे. मागच्या वर्षी याचा कालावधीत भाताची १४२ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यावर्षी आतापर्यन्त १६८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. तेलबियांची लागवड ११० लाख हेक्टरवरून १५५ लाख हेक्टर एवढी वाढली आहे. कापसाची लागवड ९६ लाख हेक्टरवरून वाढून ११३ लाख हेक्टर झाली आहे.
केंद्र सरकारच्या अनुमानावरून देशात अजूनही काही ठिकाणी पेरणी चालू आहे. यावर्षी देशाच्या सर्वच भागात चांगला पाऊस असून त्यामुळे पिके शेवटपर्यंत टिकून राहण्याचे प्रमाण जास्त राहणार आहे. जर कोणतेही अस्मानी किंवा सुलतानी संकट आले नाही तर यंदा शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळेल अशी अशा आहे. खरिपाच्या १४१ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २० जुलैअखेर १२४ लाख हेक्टर म्हणजेच ८७ टक्क्यांचा आसपास पेरा झालेला आहे. गेल्यावर्षी खरिपाचा याच तारखेपर्यंत पेरा ७० टक्के म्हणजे १०० लाख हेक्टर झाला होता. राज्यात भात, नागलीची पुर्नलागवडीची कामे वेगात सुरु आहेत. उर्वरित पेरण्या प्रगतीपथावर आहेत. सोयाबीन, भुईमूग व मका फुलोऱ्यात आहेत. बागायती कापूस आता पाते धरण्याच्या स्थितीत आहे. बहुतेक भागात निंदणी , कोळपणी इतर आंतरमशागतीची कामे सुरु आहेत, असे अहवालात म्हटले.
खरिपाचा पेरा गेल्यावर्षीच्या तुलनेत २१% नी वाढला
पुणे : यावर्षी वेळेवर आलेला मॉन्सून आणि धरणामध्ये असलेल्या अतिरिक्त साठ्यामुळे यंदा १७ जुलैपर्यंत खरिपाचा पेरा मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्ब्ल २१% नी वाढला आहे.
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)
Share your comments