सध्या भाजपकडून देशात अनेक ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राज्यात त्यांनी आमदार फोडून सत्ता स्थापन देखील केली आहे. असे असताना आता दिल्लीत देखील अशाच हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात होते.
या सगळ्या गोष्टींना आता उत्तर मिळाले आहे. दिल्ली विधानसभेत 'आप'ने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. दिल्ली विधानसभेत (Delhi Vidhan Sabha) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी आणलेला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला आहे.
यामुळे आता दिल्लीत भाजपचा प्रयत्न फसला असल्याचे दिसून येत आहे. 58 'आप' आमदारांनी केजरीवालांच्या समर्थनार्थ मतदान केले आहे, तर विरोधात एकही मत पडले नाही. यामुळे दिल्लीत आजही केजरीवाल यांचीच हवा कायम असल्याचे दिसून आले आहे.
कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, अडचणी समजून घेण्यासाठी घेतला निर्णय..
दिल्ली विधानसभेत मतांच्या विभाजनातून प्रस्ताव पार पडला. आमदारांना उभं करून मतमोजणी करण्यात आली. यावेळी 59 आमदार उपस्थित होते. याआधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भाषणे चांगलीच गाजली होती. याठिकाणी विरोधक सभागृहात उपस्थित नसल्याने त्यांच्या बाजूने शून्य मतं पडली.
कर्करोगावर पहिली स्वदेशी लस तयार सीरम इन्स्टिट्यूट करणार लॉन्च
दरम्यान, आप चे काही आमदार गायब असल्याचे सांगितले जात होते. मात्र यांच्याबद्दल देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे.'आप'च्या तीन आमदारांपैकी एक आमदार सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत. आणखी एक आमदार राम निवास गोयल हे परदेश दौऱ्यावर आहेत, तर नरेश बाल्यान ऑस्ट्रेलियाला गेले आहेत, असे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या;
धक्कादायक! कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांची शिक्षकांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल..
गाई म्हशी असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दीड लाख रुपये, वाचा काय आहे योजना
सिल्वर ओक!! शरद पवार यांच्या बाबतीत उलगडणार अनेक किस्से, पुस्तकाचे प्रकाशन..
Share your comments