कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाची रुग्ण संख्या दररोज वाढत आहे. कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक दिले जाणार आहे. प्रथम 50 लाख रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. द्वितीय १५ लाख पारितोषिक दिले जाणार आहे. तर तृतीय क्रमांकासाठी १० लाखांचे बक्षिस गावाला मिळणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
स्पर्धेत सहभागासाठीच्या अटी
ग्रामपंचायतींना १५ मार्चपर्यंत स्वमूल्यांकन करावे.
स्वमूल्यांकनाचे प्रस्ताव १५ मार्चअखेर गट विकास अधिकाऱ्याकडे सादर करणे अनिवार्य
गावांची तपासणी मुख्यकार्यकारी अधिकारी करून पहिली तीन गावे निवडणार
ग्रामपंचायतींच्या स्वमूल्यांकनाची २० मार्चपर्यंत गट विकास अधिकारी तपासणी करणार
स्पर्धा कालावधीत केलेल्या कामांचेच मूल्यांकन केले जाणार
तपासणीतील गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील गुणानुक्रमे पहिल्या गावांची यादी होणार
निवड झालेल्या गावांची नावे विभागीय आयुक्तांना पाठविणार
पुणे जिल्ह्यात १० जानेवारी ते १५ मार्च २०२२ स्पर्धा कालावधी
गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी विविध संकल्पना उपाययोजना स्थानिक पातळीवर राबविण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये गावा-गावात स्पर्धा निर्माण होऊन, गावे कोरोनामुक्त व्हावीत, यासाठी ग्रामस्थांचा उत्साह आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी आर्थिक पाठबळ बक्षिस रुपी देण्यात येणार आहे. कोरोनाचा फैलाव राज्यात सुरू झाल्यानंतर प्रत्येकांना वैयक्तिक पातळीसह सामूहिक खबरदारी आणि उपाययोजनांसाठी शासनाने प्रयत्न केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान' राबविले. आपल्या कुटुंबाबरोबर गावपातळीवर वाडी, वस्ती कोरोनामुक्त ठेवले तर तालुका, जिल्हा आणि राज्य कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे गावे कोरोनामुक्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी गावांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही स्पर्धा सुरू केली आहे.
Share your comments