मुंबई: माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Shrma) प्रकरण पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहे. काल घडलेल्या घटांनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आले आहे. राज्यातील सत्तांतरानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
करुणा शर्मा यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
काल करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची विधानभवनात भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करुणा शर्मा यांनी आपली व्यथा मांडली.
अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत माझ्यावर दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, ते रद्द करावेत, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली. एकनाथ शिंदे यांच्याकडून न्याय मिळेल असा मला विश्वास आहे.
Gujarat Election: गुजरातमध्ये होणार महामुकाबला! केजरीवाल ठोकणार गुजरातमध्ये तळ..
करुणा शर्मा यांचे गंभीर आरोप
मला अगोदर १६ दिवसांसाठी आणि नंतर ४१ दिवसांसाठी तुरुंगात टाकण्यात आले. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे. माझ्या आईने जशी आत्महत्या केली होती.
तशाच पद्धतीने मी आत्महत्या करावी यासाठी मला प्रवृत्त केले जात आहे, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात काय पावलं उचलणार, हे पाहावे लागणार आहे.
Breaking News: संजय राऊतांच्या सुटकेबाबत झाला मोठा निर्णय, आता..
Share your comments