सध्या पावसाने ओढ दिल्याने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पिके जळू लागली आहेत. यामुळे जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री मा. डी.के. शिवकुमार यांची भेट घेतली.
तसेच त्यांच्याकडे पाण्याबाबत मागणी केली. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील गावांना 'तुबची' योजनेचा लाभ देण्याबाबत कर्नाटक सरकारने सकारत्मकता दाखवली आहे.
उन्हाळ्यामध्ये जत तालुक्यातील काही गावांनी तर थेट कर्नाटक राज्यामध्ये जाण्याची तयारी दर्शवली होती. या दोन्ही राज्यांमधील पाण्यावरून वाद सुरू आहे.
४ हजार शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा लाभ, शेतकऱ्यांना होतोय फायदा...
कर्नाटक राज्याच्या तुबची बाबलेश्वर योजनेमार्फत जत तालुक्यातील पूर्वेकडच्या गावांना पाणी देण्याची मागणी केली. कोयना धरणातून दरवर्षी ४ टीएमसी पाणी कर्नाटकला सोडले जाते.
मध्यंतरी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला पाणी आणण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र नंतर काहीच झाले नाही.
देशभरात पावसाचा हाहाकार, ३४ जणांचा मृत्यू, असा असेल पावसाच अंदाज, जाणून घ्या...
कर्नाटकतून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रतून कर्नाटकला पाणी देण्याबाबत पाणी वाटप करार लवकरच करण्यात येईल, असे म्हटले जाते मात्र तसे घडताना दिसत नाही.
टोमॅटोवर मोठी ऑफर! दिल्लीत टोमॅटोची किंमत 200 रुपये किलोपर्यंत, ऑनलाइन साइट्सवर फक्त 100 रुपये किलोने विक्री
अडीच कोटी मधमाशांना किटक नाशक घातल्याने मृत्यू, धक्कादायक प्रकार आला समोर...
कांद्याची आवक कमी झाल्याने दरात काहीशी सुधारणा, शेतकऱ्यांना दिलासा...
Share your comments