या खरीप हंगामात शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा चांगलाच भोवला होता. खरीप हंगामाच्या प्रारंभी अतिवृष्टी पावसाने संपूर्ण राज्यात हाहाकार माजवला होता. यापासून औरंगाबाद जिल्हा ही वाचू शकला नाही. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी पावसाने मोठा त्राहिमाम् माजवला होता.
यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते आणि खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिके जमीनदोस्त झाली होती. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपात मोठे आर्थिक भुर्दंड सहन करावे लागले होते. यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीत बदल करण्याचे ठरवले आणि त्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा दिला.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी पारंपरिक पिकांऐवजी कलिंगड या पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड केली. यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी एकरी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांकडून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यातील बालानगरसह दरेगाव, डोनगाव, पारूंडी, तुपेवाडी, खेर्डा, खादगाव, कापुसवाडी या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगड व खरबूज पिकाच्या लागवडी कडे आपला मोर्चा वळवला. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कलिंगड व खरबूज पिकाला सध्या मोठी मागणी आहे.
उन्हात प्रचंड वाढ झाली असल्याने कलिंगड व खरबूजला मोठी मागणी असून सध्या 10 ते 12 रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. शेतकरी बांधवांना कलिंगड व खरबूज पिकातील जवळपास एकरी 25 टन उत्पादन मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना एकरी दोन लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत असल्याचे सांगितले जात आहे.
कलिंगड व खरबूज पिकातून खर्च वजा जाता शेतकऱ्यांना एकरी दीड लाख रुपये राहात असल्याने शेतकरी बांधवांकडून समाधान व्यक्त होत आहे. बालानगर येथील ऋषी गोर्डे या शेतकऱ्याने सांगितले की, अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला होता. त्यानंतर एका एकरात कलिंगड पिकाची लागवड केली आणि आता कलिंगडाला मोठी मागणी असल्याने भाव चांगला मिळत आहे. यामुळे ऋषी आता आनंदी आहेत.
Share your comments