1. बातम्या

कडब्यास पाच हजार रुपयांवर दर, शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग..

मध्य प्रदेश, गुजरात, पश्‍चिम विदर्भातील दूध उत्पादक, व्यापारी दादर कडब्यासाठी खानदेशात येत आहेत. रोज २० ते २२ ट्रक (एक ट्रक १२ टन क्षमता) कडब्याची खरेदी केली जात आहे. दर्जेदार कडबा असल्याने दर चांगले आहेत. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव, पाचोरा भागांतून दादर ज्वारीचा कडबा खरेदी सुरू आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश

मध्य प्रदेश, गुजरात, पश्‍चिम विदर्भातील दूध उत्पादक, व्यापारी दादर कडब्यासाठी खानदेशात येत आहेत. रोज २० ते २२ ट्रक (एक ट्रक १२ टन क्षमता) कडब्याची खरेदी केली जात आहे. दर्जेदार कडबा असल्याने दर चांगले आहेत. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव, पाचोरा भागांतून दादर ज्वारीचा कडबा खरेदी सुरू आहे.

खानदेशात दादर ज्वारीच्या कडब्याची (Dadar Jowar Fodder) आवक बऱ्यापैकी आहे. पण उठाव असल्याने दरही पाच हजार (Fodder Rate) ते साडेपाच हजार रुपये प्रतिशेकडा, असे स्थिर आहेत. मका, बाजरी, संकरित ज्वारी आदींचा कडबा अद्याप तयार झाला नसल्याची स्थिती आहे. सध्या दुधाला चांगले दर असल्याने शेतकरी खरेदी करत आहेत.

दरम्यान, याठिकाणी मका, बाजरी, संकरित ज्वारीची कापणी पुढील १५ ते २० दिवसांत सुरू होईल. बाजरीची कापणी एप्रिलअखेर होईल. सध्या दादर ज्वारीचा कडबा मुबलक आहे. त्याची थेट किंवा शिवार खरेदी खरेदीदार करीत आहेत.

शेतकऱ्यांनो जैविक कीड नियंत्रण

एका एकरात १५० ते १७५ पेंढ्या मिळत आहेत. यातच १४ ते १६ फूट उंचीच्या कडब्याचे दर प्रतिशेकडा सहा हजार रुपयांपर्यंत आहेत.मागील वर्षाच्या तुलनेत दादर ज्वारीच्या कडब्याचे दर ५०० ते ७०० रुपये शेकड्यामागे अधिक आहेत.

कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची, वाचा संपूर्ण माहिती..

तसेच जळगावमधील पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, धुळ्यातील धुळे, शिंदखेडा, नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर आदी भागांतील कोरडवाहू पट्ट्यात दादर ज्वारीच्या कडब्याला अधिक मागणी आहे. कारण या भागात चाऱ्याचे उत्पादन कमी असते. तसेच मका, बाजरी आदी पिकेही या भागांत नाहीत. यामुळे शेतकरी खरेदी करत आहेत.

वाढत्या मागणीने लिंबू दरात सुधारणा, शेतकऱ्यांना दिलासा
कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ! रुग्णसंख्या 16 हजारांपेक्षा जास्त, विमानतळावर चाचणी होणार..
इथेनॉल निर्मितीतून इंधन निर्मिती..

English Summary: Kadabis price at five thousand rupees, enough for the purchase of farmers.. Published on: 01 April 2023, 03:58 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters