1. बातम्या

Aanandacha Shidha : दिवाळीप्रमाणे गौरी गणपती सणातही मिळणार आनंदाचा शिधा; सरकारचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत आणखीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.तर महाराष्ट्र कॅसिनो कायदा देखील रद्द करण्यात आला आहे.

Aanandacha Shidha

Aanandacha Shidha

मुंबई 

गौरी गणपती सणात दिवाळीप्रमाणे 'आनंदाचा शिधा' वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज (दि.१८) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत आणखीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.तर महाराष्ट्र कॅसिनो कायदा देखील रद्द करण्यात आला आहे. आदिवासी समाजासाठीच्या बिरसा मुंडा या नवीन योजनेला मान्यता मिळाली आहे.

राज्यातून कॅसिनो हद्दपार करण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 1976 पासून राज्यात हे विधेयक अस्तित्वात आहे. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यासंदर्भात वारंवार मागणी होत होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात हे विधायक रद्द करण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून राज्यात कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली होती.

English Summary: Just like Diwali Gauri Ganapati festival will also provide a dose of happiness Government decision Published on: 18 August 2023, 03:13 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters