सध्या लाचखोरी हे सगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पैसे घेतल्याशिवायअडलेले काम होतच नाही असा अनुभव प्रत्येकाला येतो.असेच एक घटनाखंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथे घडली.या ठिकाणी शेतीसाठी नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी कनिष्ठ अभियंता यांनी वीस हजार रुपयांची मागणी केली होती.
याप्रमाणे तडजोड होऊन बारा हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता शरद ओकेश्वर ओंकार याला अटक करण्यात आली.या कनिष्ठअभियंत्यांना अटक झाल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून गावात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नेमके काय आहे हे प्रकरण?
शेतीसाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्यांनी कागदपत्र जमा करून वाठार कॉलनी शाखेचे कनिष्ठ अभियंता शरद ओंकार यांच्याकडे रीतसर अर्ज दाखल केला होता परंतु कनेक्शन मिळावे यासाठी शेतकऱ्याने पाठपुरावा सुरू केल्यानंतर मात्रया कनिष्ठ अभियंत्यांने शेतकऱ्याकडे वीस हजार रुपयांची मागणी केली.
नक्की वाचा:बँकांचा तोरा कायम, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची वणवण
त्यानंतर या शेतकऱ्यांनी सातारा येथील लाचलुचपत विभागाकडे यासंबंधीची तक्रार दिली.
या तक्रारीनुसार या विभागाचे प्रभारी उपअधीक्षक सुजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारालाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सचिन राऊत,पोलीस अंमलदार विनोद राजे तसेच संभाजी काटकर इत्यादींनी सापळा रचत 20000 ऐवजी तडजोड करून बारा हजार रुपये स्वीकारत असताना पोलिसांनी रंगेहात या कनिष्ठ अभियंत्यांना अटक केली.
या सगळ्या प्रकरणात कनिष्ठ अभियंत्याचे चौकशी सुरू असताना एका युवकाला नेमके मध्ये काय चालले आहे याची कल्पना नसल्यामुळे सरळ वीज कार्यालयांमध्ये घुसून कनिष्ठ अभियंता शरद ओंकार याला नवीन वीज कनेक्शन मिळण्यासाठी सहा हजार रुपये देण्यासाठी आल्याचे दिसून आले.
त्यामुळे घटनास्थळी असलेल्या सर्वच अचंबित झाले. साहेब पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही अशी प्रतिक्रिया या युवकाने दिली. दरम्यान वाठार कॉलनी येथील या कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई केल्यानंतरया विभागातील त्रस्त शेतकऱ्यांनी फटाके वाजवून कारवाईबद्दल आनंदोत्सव साजरा केला.
नक्की वाचा:7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यापासून 'इतका' वाढणार पगार
Share your comments