1. बातम्या

हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये नोकरीची संधी ; दरमहा मिळणार ४३ हजार रुपयांचा पगार

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


हिंदुस्तान एअरोनॉटिक्स  लिमिटेडने नॉन एक्झिक्युटिव्ह कॅडरमध्ये डिप्लोमा टेक्निशियनच्या पदांसाठी  भारतीय प्रक्रिया  सुरु केलीू आहे.  या भरती प्रक्रियेसाठीचे अर्ज एचएएलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार hal-india.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन  अप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन  अर्ज करु शकतात. या भरतीसाठी  अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

एचएएल डिप्लोमा टेक्निशियनच्या पदांसाठी  अर्ज करण्याची अंतिम तारीख  ७ सप्टेंबर आहे.  या भरतीप्रक्रियेसाठी  एचएएलकडून प्रसिद्ध झालेल्या  जाहिरातीनुसार डिप्लोमा टेक्निशियन आणि डिप्लोमा टेक्निशियनच्या १५ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. ही सर्व पदे एससी, एसटी  आणि ओबीसीसाठी राखीव आहेत.  तसेच या पदांवर उमेदवारांची भरती ही टेन्योन बेसिस चार वर्षांसाठी करण्यात येणार आहे.  ज्या उमेदवरांनी १० वीनंतर मेकॅनिक आणि इलेक्ट्रिकलची पूर्णवेळ पदविका उत्तीर्ण केला आहे, असे उमेदवार या भरती प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी पात्र असतील.

या भरती प्रक्रियेसाठी ओबीसी उमेदवरांसाठीची  वयोमर्यादा कमाल ३१ वर्ष तर एससी आणि एसटीच्या पदांसाठीची कमाल वयोमर्यादा ३३ वर्ष आहे.  या भरती प्रक्रियेच्या माध्यामातून निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा ४३ हजार रुपये एवढे वेतन दिले जाईल. यामध्ये  १६ हजार ८२०  बेसिक आणि पर्सनल पे आणि २६ हजार २८० रुपयांचे अन्य भत्ते आणि लाभ असतील.  दरम्यान डिप्लोमा टेक्निशियन पदांसाठी  उमेदवारांची निवड ही हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल, ही परीक्षा बंगळरू येथे आयोजित केली जाणार आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters