SBI CBO Recruitment 2020: भारतीय स्टेट बँकने सर्कल बेस्ट ऑफिसर पदासाठी भरती काढली आहे. साधरण ३८५० जागा एसबीआय भरणार आहे. तीस वय वर्ष असलेले उमेदवारही या पदासाठी अर्ज करु शकतील. अर्ज करणारा उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा. या पदासाठी अर्ज करणारे एससी/ एसटी वर्गातील आणि पीडब्ल्यू वर्गातील उमेदवारांना अर्जासाठी कोणताच शुल्क नाही. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाईटवर जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करु शकता.
वेबसाइट: sbi.co.in
पदाचे नाव - सर्कल बेस्ट ऑफिसर (CBO)
पदांची संख्या - ३८५०
वेतन - २३, ७०० रुपये प्रतिमाह
शैक्षणिक योग्यता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण असणे.
वयाची मर्यादा - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० च्या खाली असावे. वयाची मर्यादा गणना १ ऑगस्ट २०२० च्या आधारवर केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा -
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २७ जुलै २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ ऑगस्ट २०२०
अर्जासाठी शुल्क जमा करण्याची तारीख - १६ ऑगस्ट २०२०
अर्ज शुल्क -
या पदासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य/ खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी ७५० रुपये जमा करावे लागतील. तर एससी/ एसटी पीडब्ल्यू वर्गातील उमेदवारांसाठी निशुल्क आहे. अर्ज शुल्क आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, इंटनेट बँकिगद्वारे करू शकता.
अर्ज प्रक्रिया - या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जातील. अर्जासाठी उमेदवारांना स्टेट बँक इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिल्या गेलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाचे एक प्रत प्रिंटआऊट काढून आपल्या जवळ ठेवा.
निवड प्रक्रिया - उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केले जाणार आहे.
Share your comments