1. बातम्या

SCC, HSC उत्तीर्ण उमेदवारांसाठी टपाल विभागात नोकरीची संधी ; त्वरीत करा अर्ज

भारतीय पोस्ट खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये नोकरीची संधी तरुणाईसाठी चालून आली आहे. महाराष्ट्र सर्कलमध्ये एकूण १३७१ पदे भरण्यात येणार असून यासाठी इच्छूक, पात्र तरुणांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

KJ Staff
KJ Staff



भारतीय पोस्ट खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये नोकरीची संधी तरुणाईसाठी चालून आली आहे. महाराष्ट्र सर्कलमध्ये एकूण १३७१ पदे भरण्यात येणार असून यासाठी इच्छूक, पात्र तरुणांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. पोस्टातील पोस्टमन,  मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ ) एमटीएस) या जागांसाठीची ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी ही मुदत ३ नोव्हेंबरपर्यंतच होती. मात्र, त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.

अशी आहेत पदे -

पोस्टमन - १०२९

मेलगार्ड - १५

मल्टी टास्किंग स्टाफ - ३२७.

वयोमर्यादा -

या भरती प्रक्रियेसाठी ३ नोव्हेंबर २०२०२ रोजीचे वय ग्राह्य धरले जाणार आहे. या तिन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे यामध्ये असायला हवे.

भरतीसाठी काय आहे पात्रता -

 पोस्टमन आणि मेल गार्ड अशा दोन पदांसाठी इच्छूक उमेदवार, इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच त्याच्या स्थानिक भाषा मराठी असणे बंधनकारक आहे. उमेदवाराला मराठी भाषेची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. मल्टी टास्किंग स्टाफ अर्थात एमटीएस या पदासाठी इच्छूक उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. याशिवाय मराठी भाषा येणे बंधनकारक आहे. ही भरती प्रक्रिया कम्प्युटरवर आधारित परीक्षेने होईल. त्याद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

 

काय असेल वेतन -

- पोस्टमन तसेच मेलगार्ड या पदांसाठी निवडलेल्या उमेदावाराला २१,७०० ते ६९,१०० असा तीन श्रेणींमध्ये पगार मिळेल. मल्टी टास्किंग स्टाफ अर्थात एमटीएससाठी पगार लेव्हल १ नुसार असेल. १८,००० ते ५६,९०० रुपये असा पगार दिला जाणार आहे.

परीक्षा शुल्क -

परीक्षेसाठी एससी, एसटी, महिला आणि पर्सन विथ डिसॅब्लिटी प्रवर्गातील १०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर अनारक्षीत, ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ५०० रुपये शुल्क असेल.

English Summary: Job opportunities by Postal Department for candidates who have passed SSC, HSC, apply immediately Published on: 14 October 2020, 03:20 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters