1. बातम्या

राज्यातील शेतकरी महिलांसाठी ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार,पुरस्कार अंतर्गत 50 हजार आणि सन्मानचिन्ह

भारत हा एक प्रगतशील तसेच कृषिप्रधान देश आहे. हजारो वर्ष्यापासून आपल्या देशाला कृषीचा वारसा लाभला आहे. आपल्या देशातील सुमारे 90 टक्के लोक शेती व्यवसाय करत आहेत. सध्याच्या आधुनिक युगामध्ये शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात अमुलाग्र बदल घडून आले आहेत त्यामध्ये तंत्रज्ञान, पीक पद्धती मधील बदल यांचा परिणाम हा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
Jijamata Krishi Bhushan Award

Jijamata Krishi Bhushan Award

भारत हा एक प्रगतशील तसेच कृषिप्रधान देश आहे. हजारो वर्ष्यापासून आपल्या देशाला कृषी चा वारसा लाभला आहे. आपल्या देशातील सुमारे 90 टक्के लोक शेती व्यवसाय करत आहेत. सध्याच्या आधुनिक युगामध्ये शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात अमुलाग्र बदल घडून आले आहेत त्यामध्ये तंत्रज्ञान, पीक पद्धती मधील बदल यांचा परिणाम हा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

तंत्रज्ञान विकसित करून शेतकरी आर्थिक साक्षर:

सध्या तंत्रज्ञान आणि तंत्रप्रणाली च्या मदतीमुळे शेतकरी वर्गाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शिवाय उत्पन्न खर्च सुद्धा कमी झाला आहे. तंत्रज्ञान विकसित करून शेतकरी आर्थिक साक्षर तसेच प्रगतशील बनत आहे. शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून आपले उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्न शेतकरी वर्ग करत आहे. तंत्रज्ञान  वापरून  शेतकरी  कमी वेळेत शेतीमधून विक्रमी उत्पन्न मिळत आहेत.

राज्य सरकार तसेच केंद्र सरकार तर्फे प्रगतशील शेतकरी वर्गासाठी अनेक पुरस्कार देण्यात येतात त्यातील एक खास बाब म्हणजे शेतकरी महिलासाठी देण्यात येणारा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार हा आहे. या पुरस्कार अंतर्गत प्रत्येकी ५०,००० हजार रुपये रक्कम दिली जाते. या बरोबत स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र दिले जाते या पुरस्काराचा सत्कार हा पतीसह केला जातो.कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांना ha पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराच्या निवडीसाठी माननीय कृषीमंत्र्याच्या अध्यक्षेखाली अस्तित्वात असलेल्या समितीमार्फत राज्यातून प्रस्ताव मागविले जातात. आलेल्या प्रस्तावांची चौकशी करून निवड केलेल्या महिला शेतकऱ्यास हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

या पुरस्कारासाठी प्रत्येक वर्षी राज्यातून पाच महिला शेतकऱ्यांची निवड होते. कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा गटाला किंवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येत असतो. या पुरस्काराच्या अंतर्गत महिला शेतकऱ्याला 50 हजार रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह दिले जाते.

English Summary: ‘Jijamata Krishi Bhushan Award’ for women farmers in the state, 50 thousand under the award and a badge of honor Published on: 12 May 2022, 03:59 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters