आजचे 21 वे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर लोकांची अनेक कामे सहज आणि सोपी झाली आहेत. आजकाल शेतीमध्ये काम करण्यासाठी मंजूर मिळत नसल्यामुळे अनेक समस्या उभा राहत आहेत. त्यामुळे मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतामध्ये वेगवेगळ्या अवजारांचा वापर करून शेती केली जाते. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज शेतीमधील कामे सहज आणि सोपी झाली आहेत शिवाय काही क्षणातच ही कामे होत असल्यामुळे शेतकरी वर्ग निवांत झाला आहे. शेतीमध्ये नांगरणी पेरणी फणपाळी करण्यासाठी सुरवातीस बैलांचा वापर केला जायचा परंतु आता ट्रॅक्टर आणि त्यासोबत असणारी विविध अवजारे यांचा वापर करून शेती केली जाते. ट्रॅक्टर मुळे शेतीमध्ये राबण्यासाठी मजूर आणि कष्ट कमी प्रमाणात लागते.
शेत नांगरण्यासाठी 1000 रुपये प्रति तास :
परंतु शेतकरी वर्गावर वेगवेगळ्या संकटाची मालिका कायम असते. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल च्या किमती भरमसाठ वाढत चालल्या आहेत सध्या राज्यात पेट्रोल 120 रुपये लिटर तर डिझेल ने 100 री ओलांडली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर ने शेती करणे खूपच अवघड झाले आहे. पूर्वी शेत नांगरण्यासाठी 300 ते 500 रुपये एकरी लागायचे परंतु तेच आहे 1000 रुपये प्रति तास झाल्यामुळे शेतकरी वर्गाला चांगलाच धडा बसला आहे.बहुतांशी आजकाल शेतीमधील कामे करण्यासाठी अवजारे आणि वाहनांचा वापर करत आहे.
माती उचलनी, माती भरणी, शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर आणि अवजारे विहीर खणण्यासाठी अवजारांचा आणि वाहनांचाच वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल च्या किमती मध्ये वाढ झाल्यामुळे तसेच वाढत्या महागाई मुळे शेतीमधील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा फटका हा शेतकरी वर्गाला आणि ट्रॅक्टर आणि अर्थमूव्हर्स व्यवसायिकांना सुद्धा बसला आहे.
तसेच इंधन दरवाढीमुळे दरात सुद्धा मोठी वाढ झालेली आहे :
जेसीबी आणि पोकलेन प्रति तसाचा भाव हा ब्रेकरजेसीबी १ हजार १०० १ हजार ३००पोकलेन E/७० १ हजार २०० १ हजार ४००पोकलेन E/११० १ हजार ४०० १ हजार ८००पोकलेन E/१२०, १३० १ हजार ७०० १ हजार ९००पोकलेन E/२००, २१०, २२० २ हजार २०० २ हजार ४००पोकलेन E/३८० ४ हजार ४ हजार ८००डंपर ३ हजार ५०० -- प्रतिदिवस तसेच हायवा ५ हजार ५०० --प्रतिदिन तसेच वायब्रेटर रोलर ६ हजार --प्रतिदिवस ट्रॅक्टर २ हजार प्रतिदिनएवढा आहे
तसेच शिवाय यातून चालक मेंटनंस आणि डिझेल चा खर्च वेगळा असल्यामुळे सध्या च्या स्तिथीला अर्थमूव्हर्स व्यवसायकांच्या खिशाला कात्री लागली आहे शिवाय डिझेल चा खर्च सुद्धा निघत नसल्याने व्यवसायिक चिंतेत आहे. शिवाय शेतीमधील उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी वर्गाला एवढे भाडे देणे परवडत नसल्यामुळे शेतकरी वर्ग हताश झालेला आहे.
Share your comments