
Ajit Pawar Jaynat Patil News
दोन दिवसापूर्वी अर्थमंत्री आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी सादर केलेला ११ वा अर्थसंकल्प. पण तुम्हाल माहिती आहे? आजवर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी सादर केला आणि यात अजित पवार यांचा कितवा नंबर लागतो.
मागच्या काही वर्षात राज्यात मुख्यंत्री कोणीही असो उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे फिक्स असतं. आतापर्यंत ६ वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रि होण्याचा रेकॉर्ड अजित पवार यांच्या नावावर आहे.
पण याचबरोबर अजित पवार यांच्या नावासमोर अर्थमंत्री म्हणून देखील नावाची पाटी कायम असते. त्यामुळे नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प देखील अजित पवार यांनी सादर केला आहे. यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी ११ व्यादा सादर केला आहे.
मात्र याआधी कॉग्रेस नेते शेषराव वानखेडे यांनी १३ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार दुसरे सर्वाधिक ११ वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरले आहेत. अजित पवार यांनी यंदाचा ११ व्यादा अर्थसंकल्प सादर केला आहे. तर अजित पवार यांच्यापाठोपाठ तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा नंबर आहे. जयंत पाटील यांनी १० वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी जयंत पाटलांचा रेकॉर्ड मोडला आहे. पण अजित पवार या सरकारमध्ये असेच मंत्री राहिले तर ते किमान ४ वेळा अर्थसंकल्प मांडू शकतात. त्यामुळे ते सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणारेही ठरू शकतात.
Share your comments