1. बातम्या

जयंत Agro २०२१ Appने शेतकऱ्यांना मिळणार कृषीची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जयंत अॅग्रो २०२१ या व्हर्च्युअल कृषी प्रदर्शनाचा अनावरण सोहळा मंगळवारी पार पडला.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
Jayant Agro 2021 app

Jayant Agro 2021 app

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या  हस्ते जयंत अॅग्रो २०२१ या व्हर्च्युअल कृषी  प्रदर्शनाचा अनावरण सोहळा मंगळवारी पार पडला.

राष्ट्रवादी काँग्रेस सांगलीचे शहराध्यक्ष संजय बजाज व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या संकल्पनेतून या व्हर्च्युअल कृषी प्रदर्शनात अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या बांधावर एका क्लिकवर कृषी क्षेत्रातील माहिती मिळेल, शेतीविषयक गोष्टींची खरेदी विक्री करता येईल.

 

प्रगल्भ शेतकऱ्यांच्या मुलाखती पाहता येतील तसेच तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळेल. शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व काही उपलब्ध करुन देणारे हे पहिलेच व्यासपीठ आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यांनी माझे सहकारी  जयंत पाटील यांनी कृषी क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे, शेतकऱ्यांना सोयीस्कर शेती करता यावी यासाठी  त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या वाढदिवशी या उपक्रमाचे अनावरण करताना अत्यंत आनंद होत आहे.

सध्या कोविड आहे,त्यामुळे गर्दी करता येत नाही,त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व माहिती मिळवून देणारा हा उपक्रम नक्कीच उपयोगी ठरेल असे सांगितले. जयंत पाटील यांच्या योगदानाला साजेसे उपक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो.

यंदा कोविडची मर्यादा असल्याने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष संजय बजाज व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर,कुलाबा तालुका अध्यक्ष मनोज आमरे उपस्थित होते.

English Summary: Jayant Agro 2021 app will provide agricultural information to farmers Published on: 17 February 2021, 12:58 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters