यंदा अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यात जणूकाही हाहाकारच माजवला होता, या अवकाळी मुळे सर्वच पिकांची मोठ्या प्रमाणात खाणे झाले त्यामुळे शेतकरी राजाचे उत्पादन हे कमालीची घटून आले. मिरची पिकाचे देखील असेच काहीसे झाले या पिकाला देखील अवकाळी चा मोठा फटका बसला त्यामुळे यांच्या उत्पादनात मोठी घट घडून आली.त्यामुळे संपूर्ण राज्यात मिरचीला मोठी मागणी बघायला मिळत आहे. आणि दर्जेदार जवारी मिरचीला तर कमालीच मागणी आणि बाजारभाव सध्या बाजारात बघायला मिळत आहे.
शनिवारी गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर्जेदार जवारी मिरचीला तब्बल एक लाख 21 हजार रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळाला, म्हणजे तब्बल बाराशे दहा रुपये किलो प्रमाणे दर्जेदार जवारी मिरची विकली गेली. मिरची उत्पादक शेतकरी तसेच मिरचीचे व्यापारी व कृषी क्षेत्रातील जाणकार लोक असे सांगत आहेत की या बाजारभावात अजूनच कमालीची वाढ येत्या काही दिवसात बघायला मिळेल.
कोणाची होती ही दर्जेदार मिरची
गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्र-कर्नाटक बॉर्डर वरती वसलेली आहे, याच बाजार समितीत शनिवारी आजरा तालुक्यातील सुळे गावातील रहिवाशी शेतकरी अमृत कोकितकर यांनी जवारी मिरची विक्रीसाठी आणली होती. त्यांच्या या दर्जेदार मिरचीला चक्क 1 लाख 21 हजार रुपयांची बोली व्यापाऱ्यांनी लावली. मिरचीला मिळालेला हा दर आजपर्यंतचा सर्वोच्च दर असल्याचे सांगितले जात आहे. अमृत यांची मिरची ही एक नंबर दर्ज्यांची असल्यानेच तीला एवढा मोठा विक्रमी दर मिळाल्याचे सांगितले जात आहे, ही मिरची आजरी या व्यापाऱ्याने खरेदी केली. गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी जवळपास 619 पोती मिरचीची आवक झाली, शनिवारी या बाजार समितीमध्ये सात हजार रुपयापासून ते विक्रमी 121000 रुपयापर्यंत मिरचीला बाजारभाव मिळाला.
यावर्षी जवळपास सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे दर्जेदार जवारी मिरची उत्पादक शेतकऱ्यांना या मिळत असलेल्या दराचा मोठा फायदा होताना दिसत आहे. या संकट काळी शेतकऱ्यांना मिरची ने तारलेले आहे असेच म्हणावे लागेल. जवारी मिरचीला अलीकडे चांगला उच्चांकी दर मिळत आहे त्यामुळे जवारी मिरची उत्पादक शेतकरी चांगले सुखावले आहेत असे चित्र दिसत आहे.
Share your comments