एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2021-22 या वर्षा अंतर्गत जिल्ह्यासवार्षिक कृती आराखडा मंजूर झाला असून सदर योजनेअंतर्गत नमूद केलेल्या घटकांकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या बाबतीतली तपशीलवार माहिती या लेखात घेऊ.
या योजनेअंतर्गत नमूद असलेले घटक खालील प्रमाणे आहेत.
- आळं उत्पादन केंद्रासाठी अनुदान मर्यादा आठलाख रुपये.
- सामूहिक शेततळे 24×24×4 मीटर आकारमाना साठी एक लाख 75 हजार रुपये
- 34×34×4.7 मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी तीन लाख 39 हजार रुपये.
- शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी जास्तीत जास्त 75 हजार रुपये.
- संरक्षित शेती या अंतर्गत हरितगृह व शेडनेट गृहासाठी मोडेल निहाय मंजूर खर्च मापदंडानुसार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के ( जे कमी असेल ते )
- प्लास्टिक मल्चिंग 16 हजार रुपये ( जास्त जास्त दोन हेक्टरपर्यंत मर्यादा )
- विस अश्वशक्ती च्या ट्रॅक्टर साठी सर्वसाधारण प्रवर्गातील महा भूधारक लाभार्थ्यांसाठी 75 हजार रुपये व सर्वसाधारण प्रवर्गातील अल्पभूधारक,अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व महिला शेतकरी यांना एक लाख रुपये.
- शीतखोली ग्राह्य भांडवली खर्चाच्या 35 टक्के रुपये पाच लाख 25 हजार रुपये
- प्राथमिक प्रक्रिया केंद्रग्राह्य भांडवली खर्चाच्या 40 टक्के म्हणजेच दहा लाख रुपये.
- कांदा चाळ उभारणीसाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये 87 हजार पाचशे रुपये
- मधुमक्षिका वसाहत व संच वाटपासाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 40% रुपये चाळीस हजार.
- स्थायी, फिरते विक्री केंद्र शित चेंबरच्या सुविधेसह यासाठी काही भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये 15 हजार
- पॅक हाऊस साठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये दोन लाख
- अंजीर व किवी लागवडीसाठी प्रति हेक्टरी रुपये 96 हजार रुपये.
याप्रमाणे या योजनांतर्गत अनुदान देय राहील.( संदर्भ – जळगाव लाईव्ह न्युज )
शेतकरी बंधूनी या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
https://mahadbtmahait.gov.inया महाडीबीटी पोर्टल च्या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडुन अर्ज सादर करावा.सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुंनी आपला वैयक्तिकमोबाईल क्रमांक का आधार कार्ड ची लिंक असणे फार गरजेचे आहे. या योजनेच्या माध्यमातून प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी,अर्जना पूर्व संमती देणे तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी सगळ्या प्रक्रिया ऑनलाइन होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर त्वरित अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
Share your comments