1. बातम्या

जैन फार्मफ्रेश फुडचे गुणवत्तापूर्ण ‘व्हॅली स्पाईस’ मसाले आजपासून बाजारात

KJ Staff
KJ Staff


शेती, माती आणि पाणी या माध्यमातून जैन इरिगेशनने शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. जैन इरिगेशनची उपकंपनी असलेल्या जैन फार्मफ्रेश फुडसने देखील मानवी आरोग्याची दर्जेदार उत्पादनांच्या माध्यमातून काळजी घेतली आहे. जैन फार्मफ्रेश फुडसने गुणवत्तापूर्ण, संपूर्णता नैसर्गिक चव असलेले ‘व्हॅली स्पाईस’ मसाले आज बाजारात आणले आहेत. ‘व्हॅली स्पाईस’ मसाल्याच्या उत्पादनांचे अनावरण जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

देशातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या शानदार सोहळ्यास गिरीधारीलाल ओसवाल, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन यांच्यासह जैन परिवारातील सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, सौ. शोभना जैन, सौ. भावना जैन, सौ. अंबिका जैन, आशुली जैन उपस्थित होत्या. तसेच जैन फार्मफ्रेशचे अथांग जैन, सुनील देशपांडे उपस्थित होते.

बॉटल आणि सॅशे स्वरुपात मसाले

जैन इरिगेशने आपल्या उत्पदनांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. अगदी ठिबक पासून सुरू झालेल्या विविध उत्पादनांच्या शृंखलेपासून ते मसाले निर्मितीच्या क्षेत्रात ठेवलेल्या दमदार पावलापर्यंत सर्वच उत्पादनांची गुणवत्ता उच्च दर्जाची जैन इरिगेशनने राखली आहे. मसाले क्षेत्रातही ही परंपरा कायम राखत ‘व्हॅली स्पाईस’ हे बॉटल आणि सॅशे स्वरुपात बाजारात उपलब्ध होणार आहे. लवकरच हे मसाले सँडी पाऊच प्रकारातही उपलब्ध होणार आहेत.  ५०, १०० आणि २५० ग्रॅमच्या पॅकमध्ये मसाले उत्पादने बाजारात उपल्बध होणार आहेत. ग्राहकांना ताजे आणि अस्सल चवीचे मसाले मिळावे यासाठी पॅकींगवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

जळगावाच्या बाजारात आजपासून उपलब्ध

जैन फार्मफ्रेश फुडसचे ‘व्हॅली स्पाईस’ हे दर्जेदार मसाले आजपासून जळगावच्या बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पहिल्या टप्प्यात पुणे, अहमदाबाद, इंदोर, भोपाळ, लखनऊ, कानपूर, चंडीगड, लुधियाना, वाराणसी, जयपूर या शहरात ‘व्हॅली स्पाईस’ बाजारात मिळणार आहे. तर २५ नोव्हेंबर पासून देशातील प्रमुख ६० शहरात ही उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहेत.

‘व्हॅली स्पाईस’ची वैशिष्ट्ये

जैन फार्म फ्रेश फूड्सच्या ‘व्हॅली स्पाईस’चे वैशिष्ट्ये म्हणजे यात वापरण्यात आलेले मसाले पूर्णता नैसर्गिक चवीचे आहेत. पूर्णपणे शुद्धता आणि स्वच्छतेच्या वापरासह अतिउच्च गुणवत्तेच्या तंत्रातून हे मसाले तयार करण्यात आलेले आहेत. या मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. मसालाच्या वाळवणूकीसाठी आधुनिक निर्जलीकरण तंत्राचा वापर करण्यात आलेला आहेत. मसाले वाळवतांना ओलावा नसल्याने मिरची, हळद, आले, मिरी यातील ॲफ्लाटॉक्सिनचा धोका टाळता आला आहे. मिरची, हळद, काळीमिरी, जीरे, आले आदींपासून तयार केलेले मसाले चवीला देखील उच्च दर्जाचे आहेत. ‘व्हॅली स्पाईस’ म्हणजे नैसर्गिक गुणवत्तेचे उदाहरणच ठरणार आहे.


‘व्हॅली स्पाईस’ वेबसाईटचे सादरीकरण

यावेळी जैन फार्मफ्रेश फुडसचे अथांग जैन यांनी ‘व्हॅली स्पाईस’ मसाल्यांच्या वेबसाईटचे सादरीकरण केले. www.valleyspice.co.in या वेबसाईटवर ‘व्हॅली स्पाईस’ची विविध दर्जेदार उत्पादनांची माहिती देण्यात आली आहे. शिवाय मसाल्यांचे खाण्याशिवाय शरीरासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय खाद्य संस्कृतीचा अभ्यास करून त्यावर अधिकाराने भाष्य करणाऱ्या मान्यवरांचे ब्लॉग या वेबसाईटवर असणार आहेत.

नैसर्गिक गुणांनी युक्त ‘व्हॅली स्पाईस’: अतुल जैन

यावेळी सुरवातीला जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी प्रास्ताविकात जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी शेती, माती आणि पाण्याच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीचा आढावा घेत ते म्हणाले, भवरलालजी जैन यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ केली, तशी शेतकऱ्यांना करार शेतीच्या माध्यमातून बाजारपेठ देखील उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल झालेत. मसाले प्रक्रिया उद्योगातही करार शेतीच्या तंत्राचा वापर केला जाणार आहेत. संपूर्णता नैसर्गिक गुणांनी युक्त असलेल्या ‘व्हॅली स्पाईस’ ग्राहकांच्या पसंतीला निश्चितपणे उतरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

जैन फार्मफ्रेश फुडसने ‘व्हॅली स्पाईस’च्या माध्यमातून ग्राहकांसाठी शुद्ध आणि नैसर्गिक चव असलेले उत्पादन बाजारात आणले आहे. ‘व्हॅली स्पाईस’ जैन फार्मफ्रेश फुडसचे दमदार पाऊल आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासणारी कंपनी म्हणून जैन इरिगेशनला दीर्घ इतिहास आहे. भारतात पहिल्यांदाच ग्राहकांना जळगाव येथील इंटिग्रेटेड स्पाईस प्लांटमध्ये उत्पादीत केलेले निर्यात योग्य गुणवत्तेचे स्टीम स्टरिलाईज्ड मसाले ‘व्हॅली स्पाईसच्या माध्यमातून मिळणार आहेत. ‘व्हॅली स्पाईस’ लवकरच भारतातील मसालाच्या मोठ्या बाजारपेठेचे नेतृत्व करेल असा विश्वास आहे.

श्री. अनिल जैन (उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव)

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters