1. बातम्या

ITBP Bus Accident: जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ६ जवान शहीद, बसचा चक्काचूर

ITBP Bus Accident : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. 39 जवानांना चंदनवाडीवरुन पहलगामला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. ITBP जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, त्यामुळे हा अपघात झाला आहे.

ITBP Bus Accident

ITBP Bus Accident

ITBP Bus Accident : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. 39 जवानांना चंदनवाडीवरुन पहलगामला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. ITBP जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, त्यामुळे हा अपघात झाला आहे.

या दुर्घटनेत सहा जवान शहीद झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांचा आकाडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने ती अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. त्यावेळी हा अपघात घडला.

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जवान तैनात करण्यात येणार होते. त्यासाठी या सर्व जवानांना घेऊन ही बस पहलगामहून चंदनवाडी येथे निघाली होती. त्यावेळी अचानक फ्रिसलन येथे बस 200 फूट दरीत कोसळली.

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चंदनवाडीवरुन पहलगामला जात असताना ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

English Summary: ITBP Bus Accident: A bus carrying jawans fell into a valley Published on: 16 August 2022, 01:19 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters