भारतात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आजही भारतात लाखो कुटुंबाचा शेतीवर उदरनिर्वाह चालतो. महाराष्ट्रात जास्त करुन पारंपारिक शेती केल्या जाते, त्यामुळे शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्री उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. यावर्षीचा नवरात्री उत्सव 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.तसेच रब्बी हंगामाच्या सुरुवातीला घटस्थापना केली जाते.
घटामध्ये नऊ दिवस जे पाणी टाकण्यात येते, ते पाणी शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्रातुन वापरतो जसे कि शोतातील विहिर, शेततळे याच जलस्त्रोत्राचे पाणी घटामध्ये घातले जाते. घट हा मातीचा आणि कच्चा भाजलेला वापरण्यात येतो, कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरुन त्याच्या खाली ठेवलेल्या बियांना पाणी उपलब्धत होते. त्याचबरोबर घटामध्ये टाकण्यासाठी माती ही शेतकरी त्याच्या शेतातीलच घेत असतात.
शेतकरी असा करतात उत्सव साजरा -
घट नऊ दिवस बसवला जातो कारण बियांना अंकुर येण्यासाठी आठ दिवस लागतात. महत्वाचे म्हणजे शेतकरी आपल्या शेतात, जे रब्बी पिक घेणार आहे ते बियाने घटामध्ये टाकतात आणि घटामधील बियाणांची उगवण क्षमता रोज तपासली जाते. परंतू नवव्या दिवशी पाच व्यक्तिंकडून घटाची तळी उचलली जाते, जे पिके जोमाने आली आहेत त्या पिकांची शेतात पेरणी केल्या जाते. या निर्णायाला देवाचे नाव घेवुन सर्व मान्यता दिली जाते. घटामध्ये आलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपीत किंवा फेट्याच्या शिरपेचात खोचतात किंवा त्याची अंगठी करुन हातातही बांधतात,अश्या प्रकारे शेतकरी घटस्थापनेचा उत्सव साजरा करतात.
Share your comments